आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Baahubali ला टक्कर द्यायला येतोय हा चित्रपट, बजेट ऐकून म्हणाल OMG!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता विक्रमने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन नवीन चित्रपटाची माहिती दिली. - Divya Marathi
अभिनेता विक्रमने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन नवीन चित्रपटाची माहिती दिली.

साऊथचा सुपरस्टार विक्रम कायम हटके चित्रपट करण्याच्या प्रयत्नात असतो. आता विक्रम 'बाहुबली'ला टक्कर देईल असा तोडीस तोड चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. त्याचा आगामी चित्रपट सूर्यपुत्र कर्णाच्या आयुष्यावर आधारित असून यामध्ये तो लीड रोल साकारणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक आहे  'महावीर कर्ण.' दिग्दर्शक आर.एस. विमन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. याची माहिती स्वतः विक्रमने त्याच्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवर शेअर केली आहे.

 

विक्रमने एक फोटो पोस्ट करुन लिहिले, "सूर्यास्तानंतर सुर्यौद्य होतो. 'महावीर कर्ण' हिंदी मॅगनम ओपस. अॅक्टर चियान विक्रम. डायरेक्टर आर.एस. विमल. प्रोड्यूसर यूनाइटेड फिल्म किंगडम, न्यूयॉर्क. माहावीर कर्ण."


या चित्रपटासाठी जगभरातील बेस्ट टेक्निशिअन्स काम करणार असून याचे बजेट तब्बल 300 कोटी इतके आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विक्रमच्या 'सेतु' या चित्रपटाचा 'तेरे नाम' हा हिंदी रिमेक असून या चित्रपटाने सलमानच्या बुडत्या करिअरला आधार दिला होता.  

बातम्या आणखी आहेत...