आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात सॅनेटरी पॅड घेऊन मलालाने केले \'पॅडमॅन\' चे समर्थन, ट्विंकलला बोलली असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी अॅक्टिविस्ट आणि नोबल पीस प्राइज विनर मलाला यूसुफजईने काही दिवसांपुर्वीच अक्षय कुमारची अपकमिंग फिल्म 'पॅडमॅन' चे समर्थन केले. मेंस्टुअल हायजीनवर आधारित या फिल्मविषयी मलाला म्हणाली की, ही फिल्म लोकांना इंस्पायरिंग मॅसेज देईल. मलाला काही दिवसांपुर्वी जगातील सर्वात प्रसिध्द डिबेटिंग सोसायटी 'द ऑक्सफोर्ड यूनियन' मध्ये सहभागी झाली आहे. येथे 'पॅडमॅन' ची प्रोड्यूसर ट्विकल खन्नाला इनवाइट केले होते. याच वेळी त्यांची भेट झाली तेव्हा मलाला ट्विकलशी बोलली. मलाला म्हणाली की, "ही फिल्म पाहण्यासाठी मी खुप एक्सायटेड आहे. कारण या फिल्ममधून खुप चांगला मॅसेज मिळणार आहे." येथेही झाली पॅडमॅनची स्क्रीनिंग...


- ट्विंकल खन्ना एक अॅक्टर आणि प्रोड्यूसर असण्यासोबतच एक ऑथरही आहे. ट्विंकल येथे अनेक कल्चरल, पॉलिटिकल आणि हाय प्रोफाइल व्यक्तीसोबत उपस्थित होती. ऑक्सफोर्ड यूनियनमध्ये 'पॅडमॅन' ची स्क्रीनिंग ठेवली होती. येथे दाखवली जाणारी ही पहिली बॉलिवूड फिल्म आहे. ही फिल्म 9 जानेवारीला रिलीज होणार आहे. 


- ही फिल्म अरुणाचलम मुरुगनाथमच्या जीवनावर आधारित आहे. यांनी कमी किंमतीत सॅनेटरी पॅडची मशीन तयार केली.
- यावेळी ट्विकल म्हणाली की, "पीरियड्सवर फिल्म बनवण्यामागे याविषयी जनजागृती व्हावी हा माझा उद्देश आहे. कारण या विषयाविषयी फक्त भारतीय लोकांनाच संकोच नाही तर अफ्रीका आणि बांग्लादेशसारख्या देशांमध्येही आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...