Home »News» Mallika Sherawat Evicts From Paris Apartment French Court Order Rent Pay

मल्लिका शेरावतला फ्रेंच कोर्टाची नोटीस, बॉयफ्रेंडसोबत घर खाली करण्याचे दिले आदेश, हे आहे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Jan 10, 2018, 12:48 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला तिचे पॅरीसमधील घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फ्रेंच कोर्टाने विळेवर घरभाडे न भरल्याने मल्लिका शेरावतवर ही कारवाई केली आहे.

मल्लिका तिचा बॉयफ्रेंड साइरिल ऑक्सनफैंससोबत पॅरीस येथील 16 एरांडिस्मेंट अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्यावर 78,787 यूरो म्हणजेच 64 लाख रुपये थकवल्याचा आरोप आहे. हे दोघे गेल्या जानेवारीपासून याठिकाणी राहत आहेत. या फ्लॉटचे भाडे 6,054 यूरो दर महिना आहे.

फ्लॅट मालकाने सांगितले आहे की, मल्लिका वेळेवर घरभाडे देत नसल्याने त्याने ही कारवाई केली आहे. तिने आतापर्यंत केवळ 2,715 यूरो दिले आहेत. कोर्टाने तिला 14 नोव्हेंबर रोजी नोटीस पाठवली आहे आणि दोघांना घरभाडे देण्यास सांगितले आहे. पण या नोटीसचेही मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेंडने उत्तर दिले नाही त्यामुळे दोघांना घर खाली करण्यास सांगितले आहे.

14 नोव्हेंबर रोजी पॅरीस येथील कोर्टात मल्लिकाच्या वकिलाने ती सध्या आर्थिक तंगीचा सामना करत असल्याचे सांगितले आहे. सोबतच ती सध्या इतके भाडे भरु शकत नाही असेही स्पष्ट केले. मल्लिकाला सध्या कुठेच काम मिळेनासे झाले आहे त्यामुळे तिच्याकडे पैसै नाहीत असे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी मल्लिका शेरावतला पॅरीसमधील घरातून काढल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यावेळी या वृत्ताचे तिने खंडन केले होते. तिने सांगितले होते की, पॅरीसमधील तिचे घर तिला कोणीतरी दान दिले आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी पसरवु नये.

पुढच्या स्लाईडवर पाहा, मल्लिका शेरावतचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended