आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लिका शेरावतने स्वतःसोबत झालेल्या गैरवागणुकीचा केला खुलासा, सांगितले सर्व काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री मल्लिका शेरावत आपले मत हे नेहमीच स्पष्टपणे मांडत असते. ती सध्या महिलांच्या मुद्द्यावर बोलतेय. महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाच्या मुद्यांवर ती परखडपणे मतं मांडते. मल्लिका शेरावतने नुकतीच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये तिने स्वतःवार झालेल्या गैरवागणुकीचा खुलासा केला. 


असे म्हणाली मल्लिका
मल्लिका म्हणाली की, थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनच्या नुकत्याच आलेल्या सर्वेनुसार भारत महिलांसाठी जगातील सर्वात घातक देश आहे. ती म्हणाली की, भारतामध्ये महिला आणि मुलांसाठी वेगवेगळे नियम आहेत. तिने आपल्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, एक व्यक्ती मला फोन करुन आणि लेटर लिहून वाईट वर्तवणूक करत होता. मी छोटे स्कर्ट घातले यावर त्याला आक्षेप होता. तो म्हणायचा की, मी छोटे स्कर्ट का घालते. एक हरियाणाची मुलगी असे कपडे घालते याचा त्याला प्रॉब्लम होता. त्याला मला साडी घालवायची होती. हरियाणाच्या महिलांप्रमाणे मी डोक्यावर पदर घेऊन राहावे असे त्याला वाटत होते. परंतू मला काय घालायचे काय नाही हे मी ठरवणार, हा माझा वयक्तीक मुद्दा आहे. हे सांगणारा तो कोण आहे. 


- मल्लिका शेरावत सध्या आपली वेब सीरीज 'द स्टोरी' ला प्रमोट करतेय. मल्लिका शेरावतचा जन्म हरियानाच्या हिसारमध्ये झाला आहे. तिचे खरे नाव रीमा लाम्बा आहे. तिने 2003 मध्ये 'ख्वाहिश' चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटातील किसिंग सीन्समुळे ती चर्चेत आली होती.

 

बातम्या आणखी आहेत...