आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lust Stories मध्ये लतादीदींच्या आवाजातील गाणे, दीदींचे कुटुंबीय करणवर नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लता दीदींचे एक संस्कारी गाणे करण जोहरने 'लस्ट स्टोरीज'मध्ये वापरले. आता लता दीदी करणवर नाराज झाल्या आहेत. नेट फ्लिक्सवर सध्या लस्ट स्टोरीज ही वेब सिरीज सुरू आहे. यातील चार कथांपैकी एक करण जोहरने दिग्दर्शित केली आहे. त्यात एक सीनमध्ये कियारा आडवाणी मास्टरबेट करताना दाखवली आहे. तेवढ्याच टीव्हीवर 'कभी खुशी कभी गम' चे टायटल ट्रॅक वाजते. हे गाणे लतादीदींनी गायले आहे. 


लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्याने एका पोर्टलशी बोलताना म्हटले की, करणने एखाद्या भजनाप्रमाणे असलेल्या लतादीदींच्या या गाण्याचा वापर अशा आक्षेपार्ह दृश्यात का केला असेल? मला अजूनही आठवते की, लतादीदींनी हे गाणे रेकॉर्ड केले तेव्हा करण म्हणाला होता, हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मग तुम्ही हे स्वप्न एखाद्या वाईट स्वप्नासारखे का करून टाकले? लतादीदींना या वयात त्रास द्यायचा नसल्याने त्यांना याबाबत कोणी सांगितले नसल्याचेही त्यांनी म्हटले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...