आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 Augustला येणार 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'चा टीजर, 'बाहुबली'च्या रायटरने लिहिले आहे स्क्रिप्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या आगामी चित्रपटाचा टीजर 15 ऑगस्ट 2018 ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात कंगना रनोट राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मी बाईंच्या कर्तुत्वाची कथा सांगण्यात येईल. कंगनाने नुकतेच चित्रपटाचे काही सीन्स पाहिले आणि मेकर्ससोबत बसून चित्रपटाच टीजर स्वातंत्र दिनी रिलीज करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे प्रोड्यूसर कमल जैन आहेत. त्यांच्या मुंबई ऑफिसमध्ये पोहोचून कंगनाने त्यांची भेट घेतली. 

 

'बाहुबली'च्या रायटरने लिहिला आहे चित्रपट 
या चित्रपटाचा स्क्रीनप्ले 'बाहुबली'चे रायटर विजयेंद्र प्रसादने लिहिला आहे. त्यांना लक्ष्मीबाईंची कथा यूनिवर्सल वाटली. त्यांनी चित्रपटाचा स्क्रीनप्ले डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. दुसरे कारण म्हणजे हा चित्रपट 'बाहुबली'च्या स्केलवर बनवण्यात आला होता. यामुळे त्याच कॅलिबरच्या रायटरला हायर करण्यात आला. एका मुलाखतीत विजयेंद्र म्हणाले होते की, 'ही कथा मीच लिहू शकलो असतो, कारण स्वतः माझ्या मुलीचे नाव मणिकर्णिका आहे. मी बालपणी लक्ष्मीबाईंच्या कर्तुत्वाची कथा ऐकली होती. यामुळे मी माझ्या मुलीचे नाव मणिकर्णिका ठेवले. मी ब-याच काळापासून या कथेवर चित्रपट बनवण्याचा विचार करत होतो.'

 

15 प्रमुख भूमिकांसाठी वेगवेगळे कॉस्ट्यूम
चित्रपटाचे कॉस्ट्यूम नीता लुल्लाने डिझाइन केले आहे. यासाठी त्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला. या कामात त्यांच्यासोबत जवळपास 40 लोग होते. प्रमुख भूमिकांचे 40 ते 50 कॉस्ट्यूम चेंजेस आहेत. नीताने एका मुलाखतीत सांगितले की, इतर चित्रपटांमध्ये फक्त 4-5 प्रमूख भूमिका असतात. परंतू या चित्रपटात 15 प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील कॉस्ट्यूम किती वास्ट असतील याचा तुम्ही विचार करु शकता. आम्ही मुळं स्वरुपात नववारी साड्यांचा वापर कॉस्ट्यूम म्हणून केला आहे. इंग्रजांच्या यूनिफॉर्मसाठी आम्ही चांगलेच संशोधन केले आहे.


2000 क्रू मेंबर्ससोबत चित्रित करण्यात आले वॉर सीक्वेंस
चित्रपटाचे अॅक्शन निक पॉवेलने डिझाइन केले आहे. त्यांच्या टीममधील लोकांनी सांगितले की, ऑफर मिळाल्याच्या 15 दिवसांमध्येच ते अमेरिकेतून भारतात आले. अनेक वॉर सीक्वेंसचे शूटिंग त्यांनी दोन-दोन हजार लोकांसोबत चित्रित केले. कंगनाने शूटवर जाण्यापुर्वी 40 दिवस तलवारबाजी शिकली. तिच्यासोबतच अंकिता लोखंडे आणि डॅनीची ट्रेनिंगही निकने भारतात येताच सुरु केली होती. घोडेस्वारी शिकण्यासाठी सर्वांनी दोन महिने दिले. विशेष म्हणजे या चित्रपटात वुमन फायटर्स खुप आहेत. 

बातम्या आणखी आहेत...