आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नॅशनल क्रश\' प्रियाच्या गाण्याचे गीतकार आज करत आहेत जनरल स्टोअरमध्ये काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रियाची चर्चा सगळीकडेच सुरु आहे. आपल्या 26 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपने प्रियाने अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला. युट्यूब, ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सगळीकडे प्रियाच दिसतेय. प्रियाच्या डोळ्यांचे तीर तरुणाईच्या मनाला थेट भिडले आहेत. तिच्या आगामी मल्याळम सिनेमाचे गाणे सध्या व्हायल होत आहेत. 


- गाण्यातील तिच्या हावभावांनी सर्वांनाच घायाळ केलेय. 
-  'उरू अदार लव्ह' या चित्रपटातील 'मनिक्य मलरया पूवी' (Manikya Malaraya Poovi) हे गाणंही प्रकाशझोतात आलं.
- हे गाण पी. एम. ए जब्बार यांनी काही वर्षांपुर्वी लिहेल्या माप्पिला या गाण्याच हे नवीन स्टायलिश व्हर्जन आहे.
- मोहम्मद पैगंबर यांची पहिली पत्नी खदीजा बिंत ख्वालिद यांच्या स्वभावाचे वर्णय या गाण्यात केलेय.
- या गाण्याचे पहिले व्हर्जनही यूट्यूबवरही पाहायला मिळतील. माप्पिला पाट्टू हा एक पारंपारिक मुस्लीम गाण्याचा प्रकार आहे. 
- केरळातील लग्नसंमारंभात किंवा शाळा-कॉलेजमधील सास्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गाणं गायल जाते. 


- प्रियामुळे हे गाण आता पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.
- ieMalayalam.com ने या गाण्याचे गीतकार जब्बार यांना शोधून काढल. ते सध्या सौदी अरेबियातील एका जनरल स्टोअरमध्ये काम करतात. त्यांनी 40 वर्षांपुर्वी हे गाण लिहिलं. त्यावेळी ते 20 वर्षांचे होते. 
- जब्बार हे मुळचे थ्रिसूर जिल्ह्यातील आहेत. जब्बार यांनी 500 हून अधिक गाणी लिहिली आहेत. ते गेल्या 5 वर्षांपासून रियाधमध्ये एका जनरल स्टोअरमध्ये काम करताय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तरुणाईच्या मनाचा ठोका चुकवणा-या प्रियाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...