आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा कोइरालाला करायची नव्हती रणबीरच्या आईची भूमिका, या कारणामुळे झाली तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : संजय दत्तचा बायोबिक 'संजू' मध्ये मनीषा कोइराला नरगिस दत्तची भूमिका साकारत आहेत. चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. मनीषा यासोबतच 'प्रस्थानम' चित्रपटाच्या रीमेकची शूटिंग करतेय. मनीषा ही नेहमी चॅरिटीचे काम आणि कँसर अवेयरनेससाठी अनेक वेळा नेपाळमध्ये जात असते. एका मुलाखतीत तिने चित्रपटाविषयी रंजक गोष्टी शेअर केल्या.


हा चित्रपट कसा मिळाला?
गेल्या वर्षीची ही गोष्ट आहे. मी तेव्हा नेपाळमध्ये होते. राजकुमार हिरानी यांनी मला अप्रोच केले आणि सांगितले की, त्यांना माझ्याकडून नरगिसचा रोल करुन घ्यायचा आहे. या क्षणी मनात मिश्रित रिअॅक्शन आली. मला नरगिस दत्त यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीची भूमिका साकारायला मिळणार यामुळे मी आनंदी होती. कारण ही भूमिका नशीबाने मिळते. पण भिती होती की, मी 'आई'ची भूमिका जरा जास्त लवकर करतेय का असा प्रश्न होता. तसेही ही इंडस्ट्री अभिनेत्रींना खुप लवकरच आईच्या भूमिकेत सेट करते. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रणबीरपेक्षा फक्त 10 वर्षांनी मोठी आहे. अशा वेळी त्याच्या आईची भूमिका स्विकारणे योग्य आहे का हा प्रश्न होता. नंतर मी राजकुमार हिरानी यांच्या ऑफिसमध्ये त्यांना नाही म्हणायला गेले होते. पण मी त्यांच्या ऑफिसचे सकारात्मक वातावरण पाहिले, तेव्हा माझे मन बदलले. त्यांच्या टीममध्ये सर्व शांत स्वभावाचे आहेत. मग मी ही भूमिका करण्यासाठी मनाची तयारी केली. 

 

सुनील दत्त यांच्या आईची भूमिका स्वतः नरगिस यांनी साकारली होती. म्हणजेच कॅपेबल कलाकारांना असे चॅलेंजिग भूमिका मिळतात. ही भूमिका कठीण तर नव्हती ना?
- ते आहेच, पण आम्ही अभिनेत्रींच्या बाबतीत खुप सांभाळून चालावे लागते. अन्यथा इंडस्ट्री आमच्या सारख्या अभिनेत्रींना लवकरच आई बनवते. अॅक्टर्सला तर स्वतःपेक्षा तीन दशक लहान अभिनेत्रींसोबतही रोमान्स करण्याची संधी दिली जाते. पण आम्हाला थोडे सांभाळून राहावे लागते.

 

या भूमिकेत रुजण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत मिळाली?
डायरेक्टर साहेबांच्या रिसर्चने सर्व अडचणी दूर केल्या. त्यांनी खुप जास्त रिसर्च केलेले होते. यामुळे कॅरेक्टरचा सूर पकडण्यासाठी जास्त अडचणी आल्या नाहीत. प्रिया दत्तला भेटून उरलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या. मी तिला चांगल्या प्रकारे ओळखते. मी त्यांच्या एनजीओसाठी कामही केले आहे. पुढेही असेच काम करत राहिल.
 

बातम्या आणखी आहेत...