आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील नवरंग स्टुडिओला आग, जीवितहानी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. गुरुवारी उशीरा रात्री मुंबईतील नवरंग स्टुडिओत आग लागल्याची घटना समोर आली आहे. हा स्टुडिओ दक्षिण मुंबईतील लोअर परेलजवळील टोडी मिलजवळ आहे. नवरंग स्टुडिओ गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ही आग स्टुडिओच्या चौथ्या मजल्यावर लागल्याचे वृत्त आहे. हा स्टुडिओ एका जुन्या इमारतीत असून अनेक वर्षांपासून येथे कुठलेही चित्रीकरण झालेले नाही. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, आग विझवताना अग्निशमन दलातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित फोटोज...