आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टायगर...\' मध्ये याने केले 52 वर्षांच्या सलमानचे स्टंट्स, जीव धोक्यात टाकून केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवेझ काजी. - Divya Marathi
परवेझ काजी.

मुंबई - सलमान खानची फिल्म 'टायगर जिंदा है'मधील स्टंट्सची सध्या सगळीकडे चर्चा आहे. याशिवायही सलमानला तुम्ही अनेक फिल्ममध्ये अॅक्शन सीनमध्ये पाहिले असेल. मात्र तुम्हाला माहित आहे का की 52 वर्षांच्या सलमान खानसोबत त्याच्या प्रत्येक फिल्ममध्ये त्याचा एक 'बॉडी डबल' असतो. हा बॉडी डबल आहे परवेझ काजी, जो हुबेहुब सलमान सारखा दिसतो. कधी-कधी जेव्हा सलमानचे बॅक शॉट असतात किंवा एखाद्यावेळी सलमान जिथे हजर नसतो त्यावेळी परवेझ त्या सीनमध्ये दिसत असतो. 

 

'टायगर जिंदा है' मध्ये केले काम... 
- परवेझने 'दंबग-2' , 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो', 'ट्यूबलाइट' आणि नुकतीच रिलीज झालेली फिल्म 'टायगर जिंदा है' मध्ये काही स्टंट सीन केले आहेत. 
- परवेझने अनेक फिल्ममध्ये सलमानचे खतरनाक स्टंट्स सीन जीव धोक्यात टाकून शूट केले आहेत. 

 

'रेस-3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त 
- परवेझ सध्या  'रेस-3'च्या शूटिंगमध्ये सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करत आहे. 
- परवेझ आपल्या कामावर खूष असून तो नेहमी देवाचे आभार मानतो की त्याला सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे. 
- परवेझचा चेहरा सलमानशी मिळता जुळता आहे. तो त्याला हा 'खुदाचा तोहफा' मानतो. 
- याशिवाय परवेझने आनंद एल रॉय यांच्या आगामी फिल्ममध्ये शाहरुख खानसमोर सलमान खानच्या कॅमियोसाठी काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, परवेझ खाजीचे काही खास फोटो, ज्यामध्ये तो सलमानच्या लूकमध्ये दिसतो..

बातम्या आणखी आहेत...