आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे विनोद मेहरा यांची मुलगी, वडिलांच्या निधनावेळी होती 2 वर्षांपेक्षा लहान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा यांचा आज वाढदिवस आहे. 13 फेब्रुवारी 1945 मध्ये यांचा जन्म झाला होता. 30 ऑक्टोबर 1990 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. जेव्हा विनोद यांचे निधन झाले तेव्हा त्यांची मुलगी सोनिया मेहरा दोन वर्षांपेक्षा लहान होती. 2 डिसेंबर 1988मध्ये जन्मलेली सोनिया विनोद आणि त्यांची तिसरी पत्नी किरण यांची मुलगी आहे. विनोद यांनी तीन लग्ने केली होती. त्यांचे पहिले लग्न मीना बोरका आणि दुसरे लग्न बिंदीया गोस्वामीसोबत झाले होते.

 

केन्यामध्ये झाले सोनियाचे संगोपन-
विनोद यांच्या निधनानंतर सोनियाचे संगोपन तिच्या आजी-आजोबांच्या येथे केन्यामध्ये झाले. केन्या आणि लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या सोनियाने वयाच्या आठव्या वर्षी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. यादरम्यान लंडन अॅकेडमी ऑफ म्यूझिक अँड ड्रामॅटिक आर्ट्सच्या अभिनय परिक्षेत तिने सुवर्णपदक जिंकले. वयाच्या 17व्या वर्षी मुंबईला आली आणि अनुपम खेरच्या इंस्टिट्यूट अॅक्टर प्रीपेअर्समधून 3 महिन्यांचा कोर्स केला. अभिनेत्री होण्यासोबतच सोनिया ट्रेंड डान्सरसुध्दा आहे.

 

2007मध्ये केले बॉलिवूडमध्ये डेब्यू-
सोनियाने 2007मध्ये दिग्दर्शक अनंत महादेवनच्या 'व्हिक्टोरिया नं. 203' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा याच नावाने 1972मध्ये आलेल्या सुपरहिट सिनेमाचा रिमेक होता. नवीन 'व्हिक्टोरिया नं. 203'मध्ये सोनियाशिवाय अनुपम खेर, ओम पूरी, जिमी शेरगिल आणि जॉनी लिव्हर यात मुख्य भूमिकेत होते.

 

'रागिनी एमएमएस 2'मधून मिळाली ओळख-
सोनियाने आतापर्यंत जवळपास 4 सिनेमांत काम केले. तिने 'रागिनी एमएमएस 2' (2014)मध्ये काम केले होते. या सिनेमात तिने तान्या कपूर नावाची भूमिका साकारली होती. सिनेमांसोबतच सोनिया टीव्हीवरसुध्दा झळकते. एमटीव्हीच्या अनेक कार्यक्रमात (एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक इत्यादी) ती व्हीजे म्हणून झळकली आहे.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनिया मेहराचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...