आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापांनी आपले काम माझ्या आसपास विणले, त्यांचा साधेपणा मला वारसा म्हणून मिळाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : फादर्स डेच्या निमित्ताने गुलजार यांची कन्या मेघना गुलजार हिने आपल्या वडिलांविषयी काही गोष्टी शेअर केल्या. तिच्या आयुष्यात वडिलांचे काय स्थान आहे हे तिने सांगितले.

 

मला वडिलांची कन्या असल्याचा अभिमान वाटतो. या अभिमानाची जाणीव आयुष्यभराची आहे.याची जाणीव मला क्षणोक्षणी होते. 
मी लहानपणापासून दोन घरांत राहिले. एक वडील गुलजार व दुसरे आई राखीचे घर. मला वडिलांचा साधेपणा खूप आवडतो. त्यांनी मला कायम स्वातंत्र्य दिले. लहानपणी खोड्या केल्या तरी ते रागावले नाहीत. कविता व लेखनामुळे त्यांच्या होणाऱ्या कौतुकाचे मला नेहमी आश्चर्य वाटायचे. लोक मला विचारायचे, वडिलांचा एखादा गुण जोडीदारामध्ये पाहतेस का? त्यावर मी म्हणते, दोघे भिन्न प्रकारची व्यक्तिमत्त्वे आहेत याबाबत मी आनंदी आहे. वडिलांचा साधेपणाचा वारसा मला मिळाला आहे. मी त्यांना नेहमी खरा व प्रामाणिक व्यक्ती म्हणून पाहिले. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी ते देण्या-घेण्याच्या व्यवहारात कायम प्रामाणिक राहिले आणि मी तसाच बनण्याचा प्रयत्न करते. वडील प्रसिद्ध व्यक्ती नसले असते तर त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवता अाला असता, असे लोक मला विचारत. मात्र, मला असा रितेपणा जाणवला नाही. त्यांनी आपले कामाचे जीवन माझ्या आसपास गुंफले होते. ते मला शाळेतून न्यावयास येत. काही खास कार्यक्रमावेळी ते माझ्यासोबत असत. आमचे नातेसंबंध विशिष्ट बाप-लेकीच्या नात्यासारखे आहेत. आम्ही मित्र नाहीत, कारण आमच्यात आदराची रेषा कायम राहिलेली आहे, ती पार करण्याचा मी प्रयत्न कधी केला नाही. 

बातम्या आणखी आहेत...