आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा श्रीदेवी म्हणाली मीच करते तुमचा मेकअप, रोहिणी हट्टंगडी यांना दिला असा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हजारो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी हवाहवाई श्रीदेवी हिच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच चटका लागला आहे. अनेकांना तर अजूनही ही बातमी खरी आहे, यावर विश्वास बसत नाही. चाहत्यांबरोबरच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनाही श्रीदेवी यांच्या अशा अकाली एक्झिटने धक्का बसला आहे. 


श्रीदेवी या अत्यंत कमी बोलणाऱ्या लाजाळू स्वभाव असलेल्या होत्या. त्या सेटवर असल्या की कामापुरते मोजकेच बोलत असायच्या. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनीही त्यांच्याबाबत बोलताना तशीच आठवण सांगितली आहे. धर्म अधिकारी, गैर कानुनी, चालबाज अशा चित्रपटांत त्यांनी श्रीदेवी यांच्याबरोबर काम केले होते. त्यावेळी आलेल्या अनुभवांविषयी बोलताना रोहिणी यांनी त्यांच्याबाबत भरभरुन आठवणी सांगितल्या. 


कॅमेऱ्यासमोर येताच बदलायचे हावभाव
रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितले की, श्रीदेवी या अत्यंत सुंदर अभिनय करायच्या. कॅमेऱ्यासमोर येताच त्या पूर्णपणे त्यांच्या भूमिकेत शिरायच्या. अगदी क्षणाचाही विलंब त्यांना लागत नसायचा. तेच डायरेक्टर कट म्हणताच, तेवढ्याच क्षणार्धात त्या भूमिकेतून बाहेरही येत होत्या, असे त्यांनी सांगितले आहे. श्रीदेवी फारश्या बोलत नव्हत्या. पण तरीही चालबाज चित्रपटातील मेकअपबाबतचा किस्सा तर कधीही विसरणार नाही असे रोहिणी सांगतात. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, रोहणी हट्टंगडी यांनी सांगितलेला संपूर्ण किस्सा...

बातम्या आणखी आहेत...