आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Milind Soman With 25 Year Younger Wife Ankita Konwar No Sindoor And No Mangalsutra Policy

Photoshoot: मिलिंद सोमणने केले 25 वर्षे लहान पत्नीसोबत पहिले फोटोशूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : लग्नानंतर पहिल्यांदा मिलिंद आणि अंकिताने फोटोशूट केले. यामध्ये दोघं एकत्र स्टनिंग दिसत आहेत. दोघांनी ब्रांड कॅम्पेनसाठी हे फोटोशूट केले आहे. फॅशन फोटोग्राफर  Victoria Krundysheva हे शूट केले आहे. या कपलच्या लग्नाला 2 महिने झाले आहेत. अंकिता ही नवरा मिलिंदपेक्षा 25 वर्षे लहान आहे. लग्नानंतर अंकिता भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालत नाही. रिलेशनशीपच्या काळात दोघं जसे राहत होते. आताही तसेच राहतात. अंकिता ही आपली सासू ऊषाच्या खुप जवळ आहे. 


मिलिंदची दूसरी पत्नी आहे अंकिता...
- अंकिता ही मिलिंदची दूसरी बायको आहे. त्याने जुलै 2006 मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत दूसरे लग्न केले होते.
- Mylene आणि मिलिंदची पहिली भेट गोव्यामध्ये 'वॅली ऑफ फ्लॉवर्स' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर मिलिंदने 2009 मध्ये तिला घटस्फोट दिला. 
- Ex-मिस इंडिया राहिलेली मॉडल मधु सप्रेसोबतही मिलिंद सोमणचे अफेअर होते. एका जाहिरात शूटिंगमुळे हे दोघं कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकले होते. एका शूज कंपनीच्या प्रिंट जाहिरातीत दोघांनी न्यूड पोज दिली होती. यामुळे खुप वाद झाला होता. 
- या जाहिरातीत त्यांनी न्यूड होऊन शूज घातले होते आणि त्यांच्या बॉडीवर एक अजगर गुंडाळलेा होता. मुंबई पोलिसच्या सोशल सर्विस ब्रांचने या प्रकरणी 1995 मध्ये मिलिंद आणि मधुविरुध्द केस दाखल केली होती.

 

'आयरनमॅन'च्या नावाने प्रसिध्द आहे मिलिंद
- 19 जुलै, 2016 ला मिलिंदने ज्यूरिख मध्ये आयरनमॅन कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता. येथे त्याने 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकिलिंग आणि 42.2 किलोमीटर रनिंग 15 तास 19 मिनिटात पुर्ण केली होती. 
- मिलिंदनुसार त्याने वयाच्या 10 व्या वर्षी स्विमिंगची सुरुवात केली. वयाच्या 15 व्या वर्षापासून तो रनिंग करतो आणि 2004 मध्ये त्याने हाफ मॅरोथन पुर्ण केली होती. मिलिंदचा जन्म स्कॉटलँडमध्ये झाला आहे. त्याचे अजोबा डॉक्टर होते. 
- तर त्याचे वडील न्यूक्लियर साइंटिस्ट आणि आई बायो-केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर होती. स्कॉटलँड आणि काही काळ इंग्लँडमध्ये राहिल्यानंतर त्याचे कुटूंब भारतात शिफ्ट झाले. 
- मिलिंद शेवटच्यावेळी 'हमारा तिरंगा' चित्रपटात दिसला होता. त्याने 1995 मध्ये अलीशा चिनॉयचा अल्बम 'मेड इन इंडिया'मधून डेब्यू केला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मिलिंद आणि अंकिताचे लग्नाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...