आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Look :चेह-यावरच्या सुरकूत्यांवरुन दिसतेय मिथुन चक्रवर्ती यांचे वय, एवढा बदलला आहे लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहने मंगळवारी दाक्षिणात्य अभिनेत्री मदालसा शर्मासोबत लग्न केले. ऊटी येथील मिथुनच्या हॉटेलमध्ये हिंदू पध्दतीने त्यांचे लग्न झाले. लग्नाचे काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यामध्ये मिथुनही दिसत आहेत. या फोटोमध्ये 66 वर्षांचे मिथुन खुप वयस्कर दिसत आहेत. त्यांच्या चेह-यावर सुरकूत्या स्पष्ट दिसत आहेत. मिथुन लग्नामध्ये विनामेकअप होते यामुळे त्यांचे खरे वय चेह-यावर दिसले. फोटोमध्ये मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली, मुलगा रिमोह(उशमेय), नामाशी आणि मुलगी दिशानीही दिसतेय.


एकेकाळी नक्षली होते मिथुन चक्रवर्ती
- खुप कमी लोकांना माहिती असेल की मिथुन चक्रवर्ती चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी कट्टर नक्षली होते. एका अपघातात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुनने स्वतःला नक्षली आंदोलनापासून वेगळे केले.
- मिथुन यांनी अॅक्टर बनण्यासाठी पुणे फिल्म इंस्टीट्यूटची मदत घेतली. त्यांनी 1976 मध्ये 'मृगया' मधून करिअरची सुरुवात केली. यामधील दमदार अभिनयासाठी त्यांना बेस्ट अॅक्टरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.


मार्शल आर्ट्स ब्लॅकबेल्ट
- मिथुनने मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग घेतली आहे. एवढेच नाही तर ते यामध्ये ब्लॅकबेल्ट आहेत. मिथुन यांनी आतापर्यंत 4 नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत. मृगया (1976), अग्निपथ (1990), बंगली फिल्म तहादर कथा (1992) आणि स्वामी विवेकानंद (1998) साठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत.
- लीड स्टार बनण्यापुर्वी मिथुनने अमिताभ बच्चन यांच्या 'दो अनजाने'(1976) चित्रपटात काम केले होते. मिथुन इंडियन क्रिकेट लीगच्या टीम रॉयल बंगाल टायगर्सचे को-ऑनर राहिले आहेत. यासोबतच ते बंगाल फुटबॉल अकॅडमीचे को-ऑनर होते.


350 चित्रपटात मिथुन यांनी केले आहे काम
- मिथुन यांनी आतापर्यंत 350 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि अजूनही ते बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहेत. अगदी सामान्य व्यक्ती प्रमाणे दिसणा-या मिथुन यांनी बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.
- ते शेवटच्यावेळी 'हवाईजादा'(2015) या चित्रपटात दिसले होते. गहर, जीनियस, आणि ताशकंद फाइल्स हे मिथुन यांचे आगामी चित्रपट आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...