आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Miss World 2018 Manushi Chhillar May Enter In Bollywood Know What Are Doing Former Miss World Now

बॉलिवूडमध्ये एंट्री करु शकते मानुषी छिल्लर, एक मिस वर्ल्ड चालवतेय रेस्तरॉ, दोन चित्रपटात अॅक्टिव्ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 2017 मध्ये मिस वर्ल्ड बनलेल्या मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. न्यूज एजेंसीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, तिच्या मधील अभिनेत्रीची तिला जाणिव होते. ती म्हणाली की, 'मी आतापर्यंत कोणतीच संधी नाकारलेली नाही आणि योग्य वेळ आल्यावर मी बॉलिवूडविषयी निर्णय घेईल.' मानुषीपुर्वी ऐश्वर्या राय आणि प्रियांका चोप्रासोबतच अनेक मिस वर्ल्डने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आहे.


मानुषी म्हणाली योग्य वेळेची प्रतिक्षा
- मानुषी छिल्लरने एका न्यूज एजेंसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला माझ्यातील अभिनेत्रीची जाणिव होते. एक डॉक्टर आणि अॅक्ट्रेसमध्ये खुप समानता असते. माझे वडील सांगतात की, एक चांगली डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला चांगली अभिनेत्री बनावे लागेल. कारण अर्धे रुग्ण हे आपल्या वागण्यामुळेच ठिक होतील.'
- मानुषीला बॉलिवूड एंट्रीविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, 'मी अजून कोणत्याच संधीला नकार दिलेला नाही. मला अजुन काही जबाबदा-या पार पाडायच्या आहेत. योग्य वेळ आल्यावर बॉलिवूडविषयीचा निर्णय घेईल.'


17 वर्षांनंतर एक भारतीय बनली होती मिस वर्ल्ड
- चीनमध्ये 2017 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 118 देशांच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
- हरियाणा येथे राहणा-या मानुषी छिल्लरने फायनल जिंकून 17 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचा किताब जिंकून दिला होता.
- त्यापुर्वी शेवटच्या वेळी 2000 मध्ये प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

 

या मिस वर्ल्डनेही केली बॉलिवूडमध्ये एंट्री, काही यशस्वी तर काही अयशस्वी, वाचा पुढील स्लाइडवर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...