आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rapeच्या आरोपांमध्ये अडकलेल्या मुलाचे लग्न मिथुनने टाळले, लवकरच जाहिर करणार नवीन तारीख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बलात्कार आणि धमकीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती उर्फ मिमोह याचे लग्न कॅन्सल झाले. आता त्याला जामिन मंजूर झाला आहे. ऊटीमध्ये मिथुनच्या हॉटेलमध्ये लग्नाच्या तयारी सुरु होती. परंतू कोर्टाकडून उशीरा जामिनाची ऑर्डर हातात आली. यामुळे मिथुनने स्वतः मिमोहचे लग्न पुढे ढकलले. 


मिथुनने टाळले लग्न
मिमोहची वकील प्रियांका कृपाशंकर दुबेने या बातमीविषयी सांगितले की, 'कोर्ट ऑर्डरची कॉपी उशीरा मिळाली. यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.'
- याच महिन्याची एखादी तारीख ठरवून लवकरच अनाउंस केली जाईल. ऊटीमध्ये पोलिसांची रेड पडली ही एक अफवा होती. असे काहीही झाले नाही. कारण एंटिसिपेटरी बेलवर सुनवाई होईपर्यंत आणि त्यानंतर इन्वेस्टिगेशन ऑफिसर आमच्यासोबतच होते. मग ते ऊटीमध्ये रेड कसे टाकू शकतात?

- पोलिसांनी रेड टाकली ही फक्त एक अफवा आहे. यामध्ये सत्यता नाही. तर दूसरीकडे पीडित महिलेचे वकिल सोमवारी दिल्ली हायकोर्टात जाणार आहे. तिथे ते रोहिणी कोर्टातून मिमोहला जामिन मंजूर झाल्याविरुध्द अपील करतील.

 

मिमोहच्या वकीलांनी सांगितले की, लिव्ह-इन रिलेशनशीप संपल्यानंतरचे प्रकरण
- मिमोहला शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या रोहिणी कोर्टातून अँटिसिपेटरी बेल मिळाली होती. यावेळी त्याची वकिल प्रियांका कृपाशंकर दुबेने सांगितले की, तक्रारदार तरुणीने केलेले आरोप उटल ठरले आहे. प्रियांकाने सांगितले की, "संपुर्ण प्रकरण हे सिंपल लिव्ह इन रिलेशनशीपचे होते. त्यांचे लग्न झाले नाही तर रिलेशनशीप संपल्याच्या दोन वर्षांनंतर माझ्या क्लाइंटला त्रास देण्यात आला. WhatsApp मॅसेजमध्ये त्यांनी दोघांनी मूव्ह ऑन होण्याचे मॅसेज केले होते. याच्या दोन वर्षांनंतर जूनमध्ये तक्रारदाराने माझ्या क्लाइंटवर विश्वासघाताचे आरोप लावले."
- "तक्रारदाराने 313 कलमेचा दाखला देत अबॉर्शन केल्याचे आरोप लावले. हे दोन तीन वर्षांपुर्वी झाले होते. तर मग त्यावेळी कंप्लेन का केली नाही. दूसरे म्हणजे मिमोहने तिचा रेप केला तर मग त्याच्यासोबत तीन वर्षे रिलेशनशीपमध्ये का राहिली? एवढे सर्व झाल्यानंतर तक्रारदारला मिमोहसोबत लग्न का करायचे होते? प्रियांकानुसार तक्रारदारही मिमोहला लग्न न करण्याच्या दमक्या देत होती." हे सर्व लक्षात घेऊन कोर्टाने माझ्या क्लाइंटला जामिन दिला. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...