आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bail वर बाहेर असलेला मिथुन यांचा मुलगा हनिमूनसाठी कॅलिफोर्नियात, पत्नीने शेअर केले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह सध्या पत्नी मदालसासोबत कॅलिफोर्नियामध्ये हनिमून एन्जॉय करतोय. मदालसाने इंस्टाग्रामवर नव-यासोबतचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये कपल रोमँटिक पोज देताना दिसतेय. मदालसाने एका फोटोला कॅप्शन दिलेय की, "जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिले होते, तेव्हाच वाटले होते की, हाच आहे तो... आणि आता तुझी बायको बनून खुप खुश आहे." 

 

मिमोहवर भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार आणि अबॉर्शनचा आरोप लावला होता
- मिमोहने 10 जुलैला साउथ इंडियन अभिनेत्री मदालसा शर्मासोबत लग्न केले. त्यांचे लग्न हिंदू पध्दतीने झाले. मिथुन यांच्या उटी येथील हॉटेलमध्ये हे सर्व विधी पार पडले. यापुर्वी दोघांनी शनिवारी कोर्ट मॅरेज केले होते.
- या दोघांचे लग्न 7 जुलैला होणार होते. यापुर्वीच मिमोहवर एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार आणि बळजबरी अबॉर्शन करण्याचे आरोप लावले.
- भोजपुरी अभिनेत्रीने मिमोहची आई योगिता बालीवर धमकावण्याचे आरोपही लावले. अभिनेत्रीने पोलिसात तक्रार केली होती. तिथे कारवाई झाली नाही तेव्हा तिने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात न्याय मागितला.
- कोर्टाने पोलिसांना मिमोह आणि त्याच्या आई विरुध्द एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. यासोबतच पोलिसांना तपासणी करण्याचे आदेश दिले. यानंतर मिमोहने बॉम्बे हायकोर्टाकडे जामिन मिळण्यासाठी अर्ज केला. तो रद्द करण्यात आला. परंतू नंतर दिल्लीच्या रोहिणी कोर्टात अर्ज केल्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला.
- जामिन मंजूर झाल्यानंतर त्याने कुटूंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

 

बातम्या आणखी आहेत...