आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथून-श्रीदेवीच्या अफेअरमुळे नैराश्येत गेली होती योगिता बाली, केला होता Suicide चा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथून दांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मिथून यांनी 1979 साली अभिनेत्री योगिता बाली यांच्यासोबत त्यांनी लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांतच त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री श्रीदेवीची एन्ट्री झाली आणि योगिता बालींच्या सुखी संसारात ठिणगी पडली. जेव्हा योगिता बालींना मिथून आणि श्रीदेवी यांच्या अफेअरविषयी समजले, तेव्हा त्या नैराश्यात गेल्या आणि स्वतःचा जीव देण्याचाही प्रयत्न केला होता. 


या सिनेमाच्या सेटवर सुरु झाले होते श्रीदेवी-मिथून यांचे अफेअर
- रिपोर्ट्सनुसार, 1984 साली रिलीज झालेल्या 'जाग उठा इंसान' या सिनेमाच्या शूटिंग सेटवर मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.
- या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. इतकेच नाही तर एका मॅगझिनने मिथून आणि श्रीदेवी यांचे मॅरेज सर्टिफिकेट प्रकाशित केल्यानंतर मिथून दांनी लग्नाची कबुली दिली होती. 
- श्रीदेवी यांना मिथून विवाहित असल्याची कल्पना होती. पण मिथून चक्रवर्तींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रीदेवी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, मिथुन चक्रवर्तींच्या पत्नी योगिता बाली यांना लग्नाबद्दल समजल्यानंतर दिला होता हा इशारा...  

बातम्या आणखी आहेत...