आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकवर येतोय चित्रपट, 'उरी' मधून बॉलिवूड डेब्यू करणार टीव्हीचा 'महादेव' मोहित रैना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : टीव्हीचा महादेव म्हणजेच मोहित रैना सर्जिकल स्ट्राइकवर तयार होत असलेला चित्रपट 'उरी'मधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. चित्रपटात मोहित भारतीय सनेच्या अधिका-याच्या भूमिकात दिसणार आहे. उरीची शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये सुरु आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या सर्वात प्रसिध्द अभियानावर तयार होतोय. यामध्ये परेश रावल एनएसए अजीत डोभाल यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर यामी गौतम एक अंडर कव्हर एजेंट बनणार आहे. मोहितपुर्वी त्याची गर्लफ्रेंड मौनी रॉयही अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय.

 

आर्मी जॉइन करणे होते स्वप्न : मोहित रैनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, बालपणापासूनच त्याला आर्मी जॉइन करायचे स्वप्न होते. परंतू हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. आता रील लाइफमध्ये तो आर्मी ऑफिसर बनणार आहे. देश नेहमी सर्वात आधी असतो. ही संधी माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे. कारण सत्य घटनेवरील चित्रपटात मी काम करतोय.
- मोहितचे घर जम्मूमध्येच आहे. चित्रपटाचा सेटही जम्मूमध्येच लावण्यात आला आहे. 4 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

सर्जिकल स्ट्राइकचा प्लॉट
18 सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय सेनेचे 19 जवान उरी हल्ल्यात शहीद झाले होते. यानंतर 11 दिवसांनी भारतीय सेनेने पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइक करुन उत्तर दिले होते. चित्रपटात भारतीय सेनेच्या सर्जिकल स्ट्राइकची कथा दाखवण्यात आली आहे.
- सैन अभियानावर तयार होत असलेल्या या चित्रपटात आदित्य धर डायरेक्टर म्हणून सुरुवात करत आहेत. स्टार कास्टमध्ये विक्की कौशल, परेश रावल, यामी गौतम, किर्ती कुल्हरी, रॉनी स्क्रूवाला दिसणार आहेत.

सरफरोशमध्ये ईश्वर सिंह : मोहितने नुकतीच सरफरोश या टीव्ही शोची शूटिंग केली आहे. हा टीव्ही शो सारागढीच्या युध्दावर आधारित आहे. सरफरोशमध्ये तो हवलदार ईश्वर सिंहच्या भूमिकेत दिसला होता. यापुर्वी त्याने लाइफ ओकेचा शो देवो के देव महादेवमध्ये काम केले होते. यामधूनच त्याला प्रसिध्दी मिळाली होती.
- याव्यतिरिक्त चक्रवर्तिन अशोक, महाभारत, बंदिनी आणि भाभीसारख्या शोमध्ये त्याने काम केले आहे.


 

बातम्या आणखी आहेत...