आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या बातमीनंतर संजयला झाली होती अटक, फोन करून विचारले होते - आता काय करू?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- बलजीत परमारने ब्रेक केली होती संजय दत्तजवळ एके-56 रायफल असण्याचे वृत्त
- पोलिस हिंट देऊन म्हणाले होते की, त्यांना एका खासदाराच्या मुलावर संशय आहे.


बॉलिवूड डेस्क : 12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये 12 बॉम्ब ब्लास्ट झाले होते. यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता. जवळपास हजार लोक जखमी झाले होते. या ब्लास्टनंतर टाडा केसमध्ये संजय दत्तलाही आरोपी ठरवण्यात आले होते. नंतर त्याला दोषी सिध्द करण्यात आले आणि त्याला शिक्षाही मिळाली. पोलिसांनी संजय दत्तची तपासणी कशी केली, यामागे एक कथा आहे.
25 वर्षांपुर्वी संजय दत्तला ज्या पहिल्या वृत्ताच्या आधारे अटक झाली होती. त्या रिपोर्टरपर्यंत आमचे प्रतिनिधी पोहोचले. अटकेपुर्वीची संपुर्ण हकीकत आम्ही जाणून घेतली. बलजीत परमार या रिपोर्टरने हे सर्वात पहिले हे वृत्त प्रसारित केले होते. त्यांनी 30 वर्षे मुंबईच्या अंडरवर्ल्डवर रिपोर्टिंग केली आहे. शुक्रवारी 'संजू' हा संजय दत्तचा बायोपिक रिलीज होतोय. यानिमित्ताने संजयच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी.


कोण आहे बलजीत परमार: परमार 1976 मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी चंदीगढवरुन मुंबईत आले होते. परंतू काम मिळाले नाही. ते 1980 मध्ये पत्रकार बनले. बलजीत यांचा दावा आहे की, मुंबई ब्लास्टपुर्वी 1988 ते 1992 पर्यंत ते दाउद इब्राहिमला 20 वेळा भेटले. 1997 मध्ये परमारला गँगस्टर छोटा राजनने मारण्याचा प्रयत्नही केला होता. 


संजय दत्तच्या अटकेविषयी बलजीत परमार यांचा जबाब...
1. एका खासदाराच्या मुलावर संजय होता

परमार यांनी सांगितले की, बॉम्ब ब्लास्टच्या एक महिन्यानंतर मी एका स्टोरीच्या शोधात होतो. 12 एप्रिल 1993 चा हा दिवस होता. मी पोलिस स्टेशनमध्ये होतो. मी तेथील इन्वेस्टिगेशन टीमचे हेड आणि सीनियर आयपीएस ऑफिसर वायसी पवारला विचारले की, केसमध्ये काय प्रोग्रेस आहे? त्यांनी फक्त सांगितले की, एका खासदाराच्या मुलाचे नाव समोर आले आहे. ते हिंट देऊन निघून गेले. 24 तासांनंतर घटनाक्रम बदलला मी पुन्हा त्यांना विचारले की, त्या संशयीताला अटक केली का? त्यावर ते म्हणाले की, तो खासदाराचा मुलगा सध्या फॉरेनमध्ये शूटिंग करतोय. तिथून परल्यावर पाहू...
2. ते खासदार सुनील दत्त होते आणि संशयीत हा संजय दत्त होता
ऑफिसरने सांगितल्यानंतर माझा संशय खरा ठरला. सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तवरच पोलिसांना संशय होता. कारण संजय त्या काळात मॉरीशनसमध्ये 'आतिश'ची शूटिंग करत होता. मला सुनील दत्त पर्सनली ओळखत होते. मी त्यांना फोन करण्याचा विचार केला. परंतू ते जर्मनीला गेलेले होते.
जर्मनीमध्ये मी दत्त आणि माझा कॉमन फ्रेंड आणि सीनियर फोटोग्राफर जय उल्लाल यांच्या घरी फोन लावला. तेव्हा सुनील दत्त तिथेच होते. परंतू त्यांनी मला बोलण्याचे टाळले. यानंतर मी दत्त कुटूंबाच्या जवळचा व्यक्ती सुरेश शेट्टीला फोन करुन सांगितले की, जर सुनील आणि संजय दत्त यांनी फोन केला नाही तर मी हे वृत्त प्रसारित करुन टाकेल. 15 एप्रिल 1993 ला मी संजयचे वृत्त 'द डेली' वृत्तपत्राला पब्लिश केली. हे वृत्त आगीप्रमाणे पसरले. संजय दत्तने मॉरीशसवरुन मला फोन करुन सांगितले की - तुम्ही माझे मित्र आहात. तुम्ही माझ्या विरुध्द का लिहिले? मी संजयला बोललो - माझ्याकडे माहिती होती. तेव्हा संजय म्हणाला असे काहीच नाही. मी पोलिस कमिश्नरसोबत बोलेल. मला नंबर द्या. 
3. संजयने रिपोर्टरला फोन केला
बलजीत यांनी सांगितले की, "मी ब्लास्टचे वृत्त जाणून घेण्यासाठी रोज सकाळी 8.30 वाजता कमिश्नर अमरजीत सिंह सामराला फोन करायचो. वृत्त प्रसारित केल्यानंतर मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले की, संजयसोबत माझे बोलणे झाले आहे. संजयने त्यांना या वृत्ताविषयी विचारले होते. तेव्हा कमिश्नरने सांगितले की, असे काही नाही हे वृत्त खोटे आहे. तु तुझे काम कर आणि भारतात ये. त्यांना वाटले की, संजयला खरे सांगितल्यावर तो तिकडूनच पळून जाईल." 
4. संजयला पोलिसांकडे हत्यार सोपवण्याची जबाबदारी दिली
परमार यांनी सांगितले की, "नंतर संजयने मला फोन केला आणि सांगितले की, पोलिस कमिश्नर म्हणाले की, अशी काही केस नाही. तुमच्या बातमीत दम नाही. तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात. तेव्हा मी संजयला म्हणालो - मी तुमचा फॅमिली फ्रेंड आहे, धोक्यात राहू नका. मी सल्ला देतो की, हत्यार पोलिसांच्या हवाली करा. असे केले तर आर्म्स अॅक्टचा केस दाखल होईल आणि 2-4 वर्षात सुटून जाशील. जर पोलिस हत्यार शोधत घरी आले तर मोठ्या संकटात अडकशील. हे ऐकून संजयने फोन बंद केला. काही वेळानंतर संजयने पुन्हा फोन केला आणि काय करायचे ते विचारले. मी म्हणालो की, कुणाला तरी पाठवून बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हत्यार पाठवून दे. यानंतर स्वतः पोलिसांसमोर हजर हो. संजये सल्ला मानन्या ऐवजी आपला मित्र यूसुफ नलवाला हत्यार नष्ट करण्यास सांगितले. यूसुफने हे हत्याच एका लोखंडाच्या फॅक्ट्रीमध्ये फेकून दिले."
5. सुनील दत्त फक्त म्हणायचे की, मी संजयला उध्वस्त केले
परमार यांनी सांगितले की, "19 एप्रिल 1993 ला संजय भारतात परतला, परंतू यावेळी सुनील दत्त यांनी संजय दत्त परतल्याचे वृत्त पोलिसांना दिले. पोलिसांच्या टीनमने संजयला सहारा एयरपोर्टवरुन अटक केले होते. या संपुर्ण घटनेनंतर लोक माझ्या ऑफिसमध्ये फोन करुन शिव्या देत होते. सुनील दत्त मरेपर्यंत म्हणत राहिले की, बलजीतने माझ्या मुलाला उध्वस्त केले. आजही संजय किंवा त्यांच्या कुटूंबातील कोणताही व्यक्ती मला भेटला तर माझ्यासोबत बोलत नाही."

 

एक्स्ट्रा शॉट्स
- संजयचे वकील राम जेठमलानी यांनी बलजीतला संजयचे वृत्त प्रसारित केल्यामुळे एक कोटींची लीगल नोटिस पाठवली. यामध्ये लिहिले होते की, या बातमीचे पुरावे सिध्द करा. अन्यथा याचे परिणाम भोगण्यास तयार राहा. अशा 3 नोटिस त्यांना आल्या होत्या.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...