आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Review: हा आहे हिरानीचा 'संजू'; ख-या संजय दत्तच्या आयुष्यातील अर्धे सत्य, अर्धे काल्पनिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 160 मिनिटांचा 'संजू' चित्रपट पाहण्याची दोन कारणं आहेत. एक रणबीर कपूरचा दमदार अभियन आणि संजय दत्तचे वादग्रस्त आयुष्य. संजू रिलीजपुर्वीच रणबीर म्हणाला होता की, संजू हा मानवाच्या हातुन होणा-या चुका दाखवणारा चित्रपट आहे. सुरुवाच्या भागातच कळते की, हा चित्रपट संजयच्या आयुष्यातील अर्धे सत्य आणि अर्धे काल्पनिकता दर्शवते. चित्रपटात मनोरंजन आणि प्रेक्षकांच्या गरजेनुसार भूमिकांची नावे बदलण्यात आली आहेत. इंटरवलपुर्वी संजयच्या नशेच्या आयुष्याविषयी सांगण्यात आले आहे. इंटरवलनंतर संजय दत्तचे तुरुंगातील प्रवास दाखवण्यात आला आहे.


स्टार कास्ट : रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीया मिर्जा, मनीषा कोईराला, करिश्मा तन्ना, परेश रावल, विकी कौशल, जिम सर्भ, बोमन ईरानी

 

दिग्दर्शक : राजकुमार हिरानी 


रेटिंग : 4\\5
इंटरवलपर्यंत वाईट सवयींची कथा : 
- चित्रपटाच्या सुरुवातीस संजय दत्त एका खुर्चीवर बसून आपली बायोग्राफी वाचत असतो. यासाठी संजय बायोग्राफर अनुष्का शर्माला लंडनवरुन बोलावतो. येथीन कथा फ्लॅश बॅकमध्ये जाते. 
- सर्वात पहिले त्याच्या आयुष्यातील एक भाग येतो. तो म्हणजे जेव्हा त्याच्या वडिलांनी रागावल्यामुळे तो ड्रग अॅडिक्ट होतो. ड्रग्स आणि गर्लफ्रेंडचा नशा दिर्घकाळ चालतो.
- आई नरगिसच्या मृत्यूनंतर संजू खचून जातो आणि एकानंतर एक चुका करतो.
- इंटरवलपर्यंत संजू म्हणजे बिघडलेले आपत्य असे दाखवण्यात आले आहे. मीडिया यापासून खुप नाराज असते.


इंटरवलनंतर तुरुंग यात्रा
- इंटरवलनंतर कथा बाबरी पाडण्यापासून सीन सुरु होतो. मुंबई ब्लास्ट आणि एके 56 केसनंतर लोकांनी आणि मीडियाने त्याला आतंकवादी म्हणणे सुरु केले होते. या सर्व गोष्टींमुळे हताश झालेल्या संजूला आयुष्य संपवायचे होते.
- स्टारडममध्ये शाहरुख-आमिरचा दबदबा वाढतो आणि संजू चित्रपटासाठी तसरतो. मीडिया आगीमध्ये तेल ओतायच काम करते. जेल आणि बेलमध्ये रेंगाळल्यानंतर मुन्नाभाईमधून त्याचे चांगले दिवस येतात.

 

कोण कोणत्या भूमिकेत
- जिम सर्भ सलमानच्या भूमिकेत नाही. तर तो संजयचा पहिला मित्र जुबिन मिस्त्रीच्या भूमिकेत आहे. तर जुबिननेच संजयला ड्रग्स आणि दारुची सवय लावली होती.
- परेश रावल सुनील दत्त यांच्या भूमिकेत आहेत. तर नरगिस दत्तने मनीषा कोईरालाची भूमिका साकारली आहे.
- सोनम कपूरच्या भूमिकेविषयी जास्त उत्सुकता होती. सोनम या चित्रपटाच ऋचा किंवा टीना मुनीमच्या भूमिकेत नाही. तर ती संजयची पहिली गर्लफ्रेंड बनली आहे. ती पारसी होती. संजय गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार होता. परंतू तो ड्रग्समुळे विसरला. 
- विक्की कौशलने संजयच्या अशा फॅनची भूमिका साकारली आहे, ज्याला त्याला अमेरिकेत भेटायचे होते. चित्रपटात विक्की हा कन्हैया लाल कापसेच्या भूमिकेत आहे.

 

क्रिटिक्सपुर्वीच प्रेक्षकांनी दिले 4 स्टार
'संजू'ला क्रिटिक्सची रेडिंग्स मिळणे बाकी आहे, परंतू फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून येणा-या दर्शकांनी चित्रपटाला 4 स्टार दिले आहेत. सोशल मीडियावर यूजर्स रणबीरच्या अभिनयाची स्तुती करत आहेत.
- ट्वीटरवर एक यूजर कुनाल निगमने लिहिले की, चित्रपटासाठी फक्त एक शब्द - एक्स्ट्रॉऑर्डिनरी. संजूला 5 मधून 4.5 स्टार. चित्रपट ब्लॉक बस्ट होणार आहे.


ग्राफिक आणि सिनेमेटोग्राफी कमाल

संजयच्या सुपरहिट चित्रपटांच्या रीयल सीनमध्ये रणबीरला ग्राफिक्सच्या माध्यातून उत्कृष्ट पध्दतीने प्लेस करण्यात आले आहे. हे आपल्याला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसले आहे. रवि बर्मन, संजू चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर आहेत. रणबीरच्या अभिनयानंतर चित्रपटात रवीने प्राण ओतले आहेत.
- इंटरवलनंतर चित्रपटहा बाबरी मस्जित पाडल्यानंतर झालेल्या घटनांनी सुरु होते.

 

तक्रारीनंतर कट केला नाही सीन
सेन्सॉर बोर्डने टॉयलेट लीक होण्याचा सीन फिल्म मिकर्सला काढण्यास सांगितले होते. 'संजू'च्या ट्रेलरमध्ये बैरकचे टॉयलेट ओव्हरफ्लो होण्याच्या सीनवर आक्षेप घेण्यात आला होता. आरटीआय अॅक्टिव्हिस्ट पृथ्वी मस्केने सीबीएफसीला लिहिले होते की, चित्रपटात जेलला चुकीच्या पध्दतीने दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
- मस्केच्या तक्रारीनंतर सीबीएफसीने गुरुवारी हा सीन चित्रपटातून काढण्यास सांगितले होते. परंतू चित्रपटाने हा सीन कट केला नाही.
- राजू हिरानीने हा चित्रपटाच घेण्यामागचे कारण सांगितले होते की, संजय जेलमध्ये होता तेव्हा मान्सूनमध्ये खुप पाऊस झाल्यामुळे जेलचा टॉयलेट ओव्हर फ्लो झाल्याचे सांगितले होते.

 

बातम्या आणखी आहेत...