आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Munmun Dutta Aka Babita And Bhide Writes Emotional Posts After The Death Of Kavi Kumar Azad

डॉ. हाथीच्या निधनाने मानसिक धक्क्यात \'तारक मेहता...\' कलाकार; साश्रू नयनांनी व्यक्त केल्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चश्मा' यात बबिताजीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता हिने आपले सहकारी डॉ. हाथी अर्थात कवि कुमार आझाद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिने फेसबूकवर आझाद यांच्यासोबत काढलेला एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "आम्हाला तुमची अशी आठवण येते आणि नेहमीच येत राहील." कवी कुमार आझाद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी मुंबईत निधन झाले. 


भावूक झाले सहकारी...
- डॉ. हाथी यांच्या अचानक गेल्याने मुनमुन दत्ताने फेसबूकवर लिहिले, "स्वच्छ मन, उत्साहाने भरलेली आणि नेहमीच खुश राहणारी व्यक्ती रोज सकाळी आम्हा सर्वांना हसतमुखाने गुड मॉर्निंग म्हणत होती. तुम्ही आमच्यापर्यंत येण्यापूर्वी आम्हाला तुमचे गीत ऐकू यायचे आणि आम्हाला तुम्ही येत असल्याचा भास व्हायचा. एक अशी व्यक्ती जिच्याशी बोलणेच अतिशय क्यूट होते तो आमचा शुभचिंतक होता. परिस्थिती कशीही असे आपल्या चेहऱ्यावर नेहमीच एक स्मितहास्य राहायचे."
- "खरोखर आज आम्हाला कसे वाटत असेल हे शब्दांमध्ये मांडताच येणार नाही. सेटवर अशी एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याच्या डोळ्यात अश्रू नाहीत. इतका मोठा धक्का बसेल याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. कालच तर आपण सोबत शूट केले होते. आपल्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण येथील प्रत्येकाला आठवत आहे. आमच्याकडे आपल्या आठवणींशिवाय दुसरे काहीच नाही. अशा आठवणी ज्या डोळे पाणावलेले असतानाही चेहऱ्यावर हास्य फुलवतात. भगवान आपल्या आत्म्याला शांती देवो हाथी भाई."

 

भिडे उर्फ मंदार चांदवळकर म्हणाले...
- "आपल्या उभ्या आयुष्यात एक सच्च्या मनाचा माणूस पाहिला होता तो तुम्हीच. तुम्ही मला भेटलात यासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो. माझ्यासोबत स्पेशल सिंधी पराठा शेअर केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. (आपल्या जाण्याने) मला मानसिक धक्का बसला आहे." 
- मी तर हेच म्हणेल, की त्यांनी आपली सर्व कामे आटोपून जगाचा निरोप घेतला. ते काहीच अपुरे सोडत नव्हते. त्यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. खरोखर ते आझाद झाले आहेत.
- चांदवळकर पुढे म्हणाले, ''सोमवारी सकाळीच फिल्मसिटीच्या एका सीक्वेन्सचे शूट होते. मग कळाले, की आझाद यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे, आम्ही त्यांना सोडूनच शूट सुरू केले होते. माझे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध होते. आम्ही सोबतच बसून जेवत होतो. एवढेच नव्हे, तर मी शूटवर येताच ते मला विचारायचे "आज खाने मे क्या लाया" रिअल लाइफमध्ये सुद्धा ते खाण्याचे शौकीन होते.

 

बातम्या आणखी आहेत...