आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywood Update:सलमानच्या चित्रपटात आयटम नंबर करणार नागार्जुन, रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'साठी शूटिंग सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद: साउथचे सुपरस्टार नागार्जुन लवकरच सलमान खान स्टारर चित्रपट 'भारत' चित्रटात आयटम नंबर करताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार या गाण्यात त्याच्यासोबत साउथ अॅक्ट्रेस रंभा असणार आहे. सलमानसोबत नागार्जुन यांचा हा पहिला सिनेमा आहे. हिंदी चित्रपटांविषयी बोलायचे जाले तर नागार्जुन शेवटच्यावेळी 15 वर्षांपुर्वी 2003 मध्ये आलेल्या 'एलओसी: कारगिल' मध्ये दिसले होते. यामध्ये त्यांनी राजपूताना रायफल्सचे मेजर पद्मपाणी आचार्यची भूमिका साकारली होती. नागार्जुन शेवटच्यावेळी जून, 2018 मध्ये आलेल्या तेलुगु अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'ऑफिसर' मध्ये दिसले होते. या चित्रपटात त्यांनी आयपीएस शिवाजी रावची भूमिका साकारली होती. 


रणबीर-आलियाच्या 'ब्रम्हास्त्र' मध्ये दिसणार नागार्जुन
यासोबतच नागार्जुन हे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट 'ब्रम्हास्त्र' मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, नागार्जुन यांनी चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. या पोस्टसोबत करण जोहरने एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये नागार्जुन आणि त्याची पत्नी अमाला अक्किनेनी, रणबीर, आलिया आणि अयान मुखर्जीसोबत पोज देताना दिसत आहेत.


करण जोहरने पोस्टसोबत लिहिले की, - यावेळी आम्हाला खुप गौरवशाली फिल होतेय. कारण नागार्जुन सारखे सुपरस्टार आमच्या चित्रपटात एक स्पेशल भूमिका साकारणार आहेत. आमच्या चित्रपटात काम करण्यास नागार्जुन यांनी स्विकारले यामुळे आम्ही त्याचे आभार मानतो. परंतू नागार्जुनच्या भूमिकेविषयी अजुन खुलासा करण्यात आलेला नाही. तर रणबीर कपूर 'ब्रम्हास्त्र'मध्ये पहिल्यांदा सुपरहीरोच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात रणबीर जवळ काही आगीसंबंधी शक्ती असणार आहे. याच्या मदतीने तो जगाचे रक्षण करणार आहे. चित्रपटात मौनी रॉयही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिची भूमिका निगेटिव्ह असणार आहे. ती आलियाच्या मार्गात अडथळे निर्माण करेल. या चित्रपटात अमिताभ बच्चनसुध्दा प्रमुख भूमिकेत आहेत. परंतू त्यांच्या भूमिकेविषयी अजुन खुलासा करण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...