आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरलेल्या वेळेपुर्वीच रिलीज होणार 'नमस्ते इंग्लंड' परिणीती-अर्जुनने ट्वीटवर केली घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा 'नमस्ते इग्लंड' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आहेत. सध्या हे दोघं चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याच काळात परिणीती आणि अर्जुन कपूरने 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. 

 

यादिवशी रिलीज होईल नमस्ते इंग्लंड
अर्जुन कपूरनुसार 'नमस्ते इंग्लंड' यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. अर्जुनने ट्वीट केले - 'एन्टटेन करण्यासाठी थोड लवकर येत आहोत, या दस-याला नमस्ते इंग्लंड' तर अर्जुन कपूरची हिरोइन परिणीती चोप्रानेही यावर ट्वीट केलेय. तिने 'नमस्ते इंग्लंड दस-याला' असे ट्वीट केलेय.

 

'नमस्ते लंडन' चा सीक्वेल आहे 'नमस्ते इंग्लंड'
'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या 'नमस्ते लंडन' चित्रपटाचा सीक्वेल आहे. याचे दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाहने केले होते. 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाचेही दिग्दर्शन विपुल शाहनेच केले आहे. हा चित्रपट येत्या 7 डिसेंबरला रिलीज होणार होता. परंतू आता याची रिलीज डेट बदलून दस-याला केली आहे. म्हणजेच 19 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

विविध ठिकाणी झाली शूटिंग 
'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटाची शूटिंग विविध 75 लोकेशन्सवर झाली आहे. विशेष म्हणजे परिणीची चोप्रा आणि अर्जुन कपूरची जोडी यावेळी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यापुर्वी हे दोघं 'इश्कजादे' चित्रपटात एकत्र दिसले होते. यासोबतच हे दोघं 'संदीप और पिंकी फरार' मध्येही दिसणार आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा परिणीची आणि अर्जुनचे फोटो आणि त्यांनी केले ट्वीट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...