आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रजनीकांत' सोबत चित्रपट करण्यास नाना पाटेकर यांनी दिला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रजनीकांत आणि नाना पाटेकर स्टारर 'काला' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतोय. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार चित्रपटाने तीन दिवसांमध्येच वर्ल्डवाइड 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पीए रंजीतच्या या चित्रपटात रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची केमेस्ट्री खुप पसंत केली जात आहे. परंतू तुम्हाला माहिती नसेल की, एकेकाळी नाना पाटेकर यांनी रजनीकांत यांच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता.


यामुळे चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार
- नाना पाटेकरने एका टेबलायटसोबत बातचीत करताना सांगितले होते की, त्यांना 'काला' मध्ये निगेटिव्ह भूमिका करायची नाही. परंतू रजनीकांत यांनी त्यांना प्रेमाने तयार केले. नाना पाटेकर यांच्यानुसार रजनीकांतसारख्या मोठ्या स्टारने त्यांना सांगितले की, जर रजनी चित्रपटात एकटे असतील तर त्यांना पाहण्यासाठी कुणीच जाणार नाही. यामुळे नाना या भूमिकेसाठी तयार झाले. रजनीकांत आणि नाना पाटेकर पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसत आहेत. चित्रपटात नाना पाटेकर यांनी भ्रष्ट राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे. तर रजनीकांत धारावी(मुंबई) झोपडपट्टीच्या लीडरच्या भूमिकेत आहे. ते आपल्या विभागातील लोकांच्या हक्कासाठी लढत असतात.

बातम्या आणखी आहेत...