आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूपूर्वी अभिनेत्याचा शेवटचा FB फोटो, फार्महाऊसवर घालवत होता निवांत क्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता नरेंद्र झा यांचे आज (14 मार्च) पहाटे पाच वाजताच्या सुमारास निधन झाले. ते  55 वर्षांचे होते. हार्ट अटॅकने त्यांची प्राणज्योत मालवली. नरेंद्र मुंबईनजीकच्या वाडा येथे त्यांच्या फार्महाऊसवर होते. मृत्यूच्या एक दिवसाआधी त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. या फोटो नरेंद्र त्यांच्या फार्म हाऊसवर निवांत क्षण घालवताना दिसत आहेत. फेसबुक पोस्टनंतर 24 तासांतच त्यांच्या निधनाचे वृत्त आले.


आजारी होते नरेंद्र...
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र यांना आलेला हा तिसरा हार्ट अटॅक होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना मायनर हार्ट अटॅकचा झटका येऊन गेला होता. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतर नरेंद्र त्यांच्या पत्नी पंकजासोबत वाडा येथील त्यांच्या फार्म हाऊसवर विश्रांतीसाठी आले होते. 


पुढे वाचा, नरेंद्र झा यांच्याविषयी... 

बातम्या आणखी आहेत...