आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर विवादास्पद पोस्ट शेअर केल्याबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर आरोप दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकीने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. अयाजुद्दीनवर आरोप लावण्यात आला आहे की, त्याने हिंदू देवतांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केला आहे. उत्तर प्रदेश येथील मुजफ्फरनगर येथील एका हिंदूवादी संघटनेने अयाजुद्दीनविरुद्ध केस दाखल केली आहे. अयाजुद्दीने फेसबुकवर हिंदू देवतांचे विचित्र कपड्यांतील फोटो शेअर केले आहेत. त्याच्याविरुद्ध कलम १५३ नुसार आरोप दाखल करण्यात आला आहे. अयाजुद्दीने दिली सफाई...

 

अयाजुद्दीने त्याच्यावर लावले गेलेले सर्व आरोप खोटे सांगितले आहेत. तो म्हणाला की मी एका फोटोबद्दल फेसबुकवरुन तो आक्षेपार्ह असल्याचे सांगत होतो पण गोष्ट माझ्यावरच पलटली आणि माझ्यावरच आरोप दाखल करण्यात आला. अयाजुद्दीनचे म्हणणे आहे की  त्याने ती पोस्ट शेअर करत कोणीही अशी पोस्ट शेअर करु नये असे म्हटले होते. आपण सर्व भारतीय आहोत आणि अशाप्रकारे कोणाच्याही भावनांना दुखावता कामा नये.

बातम्या आणखी आहेत...