आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्याचे पारणे फेडेल मुंबईतील हे भव्य बॉलिवूड थीमपार्क, 25 एकरमध्ये उभारणार शीश महल, आग्रा किल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर दुबईकडे बॉलिवूड पार्क आहे, सिंगापूरमध्ये डिज्नी लँड आहे, हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी आहे तर आता मुंबईतही भव्यदिव्य बॉलिवूड थीम पार्क उभारण्याची जोरदार तयारी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधा अकबर आणि इतर लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचे भव्यदिव्य सेट उभारणारे एन.डी स्टुडिओ आता बॉलिवूडचे नवे थीमपार्क उभारणाच्या तयारीत आहेत. या थीम पार्कमध्ये सर्व बॉलिवूड ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांचे भव्य दिव्य आणि लॅविश थीम पार्क येणार आहे. 


या थीम पार्कबद्दल कला दिग्दर्शक आणि एन.डी स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बोलताना सांगितले की, "भारतीय सिनेसृष्टीने यशस्वी 100 वर्षे पूर्ण केले आहेत. यादरम्यान अनेक चित्रपटांचे भव्यदिव्य आणि सुंदर सेट बांधण्यात आले आणि नंतर ते तोडण्यातही आले. या थीमपार्कद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर तुम्ही परदेशातील स्टुडिओ पाहिले त्यातील युनिव्हर्सल स्टुडिओ आणि वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ बघितले तर त्यात प्रेक्षकांसाठी एक मोठे दालन खुले असते. असाच काहीसा प्रयत्न एन.डी स्टुडिओतर्फए केला जाणार आहे."

 

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे थीम पार्क सर्वांसाठी खुले होणार आहे. कर्जत येथे 25 एकरमध्ये हे पसरलेले असणार आहे. देसाई यांनी सांगितले की, या थीम पार्कमध्ये आपल्याला शीश महल, आग्रा किल्ला, प्राचीन काळातील गावे, मुंबईच टाऊन स्क्वेअर, फॅशन स्ट्रीट आणि चोर बाजार पाहायला मिळणार आहे. 

 

या थीमपार्कमध्ये एक बॉक्स ऑफिस काउंटरही असणार आहे ज्यात फेमस बॉलिवूड कॅरेक्टर्स जसे की, मोना डार्लिंग, गब्बर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. तसेच प्रेक्षकांसाठी एक मेकअप आणि कॉश्च्युम एरीनाही असणार आहे ज्यात प्रोफेशनल मेकअप आर्टीस्ट लोकांना त्यांच्या आवडत्या ओन स्क्रिन कॅरेक्टर्ससारखे नटवण्यात मदत करणार आहे. त्यात बाजीराव, मोगॅम्बो यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 

 

नितीन यांनी पुढे बोलतांना सांगितले की, फुडचा विचार केला तर या थीमपार्कमध्ये 70च्या दशकातील प्रमाणे असे रेस्टॉरंट तयार केले जाणार आहे ज्यात गायक आणि नृत्याचा लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे. हे गायक आणि डान्सर तेथील कस्टमरसोबत इंटरॅक्टही करतील. यात जेलखाना नावाचे अजून एक रेस्टॉरंट असणार आहे ज्यात जेलमधील कैद्याचे जीवन कसे असते ते आपल्याला अनुभवायला मिळेल आणि कैद्यांप्रमाणेच जेवणही दिले जाणार आहे. मुंबईतील खाऊ गल्लीची आठवण करुन देणाऱ्या या गल्लीत स्ट्रीट फुड खासियत असणार आहे आणि सर्वात विशेष गोष्ट येथे तुमच्यासोबत तुम्हाला तुमचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्रीही भेटू शकते जी या खाऊगल्लीत तुमच्यासोबत खाण्यासोबत गप्पाही मारेल. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एन.डी स्टुडिओच्या या थीम पार्कची खास झलक....

बातम्या आणखी आहेत...