आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neeraj Vora Death Saddens: PM Narendra Modi To Akshay Kumar Remembers Condolence

नीरज वोरा यांचे दीर्घ आजाराने निधन, मोदी-अक्षय कुमारसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रंगीला (1995), सत्या (1998), बादशाह (1999), पुकार (2000), बोल बच्चन (2012) आणि वेलकम बॅक (2015) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते नीरज वोरा यांचे गुरुवार पहाटे चार वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. मागील 13 महिन्यांपासून ते कोमात होते. मुंबईतील अंधेरीस्थित कृती केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते परेश रावल यांनी ट्वीट करुन नीरज वोरा यांच्या निधनाची बातमी दिली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.. 
- पीएम नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली देणारे ट्वीट करत लिहिले, "नीरज वोरा यांच्या निधनाने आम्ही अतिशय दुःखी आहोत. आम्ही एक उत्साही आणि क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी गमावली आहे. कलाकृतींच्या माध्यमातून ते कायम आपल्यात असतील."


बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली...
- अक्षय कुमारने ट्वीट केले, "मी विनोदी चित्रपटांकडे वळण्यामागचे कारण हेच होते. अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशा मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्त्वाला गमावल्याचे अतीव दुःख आहे. इंडस्ट्रीतील अनेकांना त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळाले आहे."
- परेश रावल यांनी लिहिले, "लेखक आणि हेरा-फेरी सारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक आता या जगात नाहीत. ओम शांती" 
- तुषार कपूरने लिहिले, "नीरज वोराजींच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांनीच मला गोलमाल-1 मध्ये भूमिका दिली होती. RIP..।"
- ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श, करण कुंद्रा, विवेक अग्निहोत्री, राहुल ढोलकिया, कुणाल कोहलीसह अनेक सेलिब्रिटींनी नीरज वोरा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, सेलिब्रिटींचे ट्वीट... 

 

बातम्या आणखी आहेत...