आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजू' च्या पोस्टरमध्ये परेश रावलला ओळखणे कठीण, दिसत आहेत सुनील दत्तची कॉपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. वडील आणि मुलाची केमिस्ट्री दाखवणारे हे पोस्टर इमोशनल करणारे आहे. पोस्टरमध्ये संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसतोय. तर त्याच्या वडिलांच्या म्हणजेच सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल दिसत आहेत. चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी   यांनी हे पोस्टर शेअर करत लिहिले की, "#Sanju पिता-पुत्राची कथा आहे. आज वडिलांना भेटा... परेश रावल. यांच्यासोबत काम करायला मजा आली."  विशेष म्हणजे पहिल्या नजरेत परेश रावल यांना ओळखणे कठीण झाले. परेश रावल पुर्णपणे सुनील दत्तची कॉपी दिसत आहेत.

 

घाबरलेला दिसतोय रणबीर
- पोस्टरमध्ये संजय दत्तची भूमिका साकारणारा रणबीर कपूर घाबरलेला दिसतोय. तर परेश रावलने त्याला मिठी मारलेली आहे. पोस्टर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, ज्या काळात संजय ड्रग्स घेत होता, सुनील दत्त यांनी त्याला रिहॅब सेंटरमध्ये पाठवले होते, तेव्हाचा हा फोटो आहे. काही काळापुर्वी एका मुलाखतीत परेश रावलने सांगितले होते की, "विशेषतः हा चित्रपट एका पिता-पुत्राची कथा आहे. चित्रपट सुनील दत्त आणि संजय दत्त यांच्याविषयी आहे. राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांच्या लिखाणामुळे आणि रणबीर कपूरच्या अभिनयामुळे चित्रपट उत्तम बनला आहे."

 

29 जूनला होणार रिलीज
- विधु विनोद टोप्राच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट तयार झाला आहे.  परेश रावल आणि रणबीर कपूरसोबतच, मनीषा कोइराला, सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि दीया मिर्जा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट 29 जूनला रिलीज होणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाचे पोस्टर्स...

 

बातम्या आणखी आहेत...