आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयच्या चित्रपटाला झाले होते कोट्यावधींचे नुकसान, आता मिळाला दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टडेन्मेंड डेस्क : अभिनेता अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाच्या सारागढी किल्ल्याच्या सेटवर आग लागून जबरदस्त नुकसान झाले होते. रिपोर्टनुसार सेटवर आग लागल्याने जवळपास 18 कोटींचे नुकसान झाले. 24 एप्रिलला चित्रपटाची शूटिंग सुरु होती. यावेळी किल्ल्याची फक्त एकच भिंत स्फोट करुन उडवायची होती. परंतू हवा जास्त असल्यामुळे आग पसरली आणि काही मिनिटातच संपुर्ण सेट जळून खाक झाला होते. सेटवर झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याविषयी प्रोडक्शन कंपनी धर्मा प्रोडक्शनने इंश्योरेन्स कंपनीसोबत बातचित केली आहे.

 

मिळणार इंश्योरेन्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार इंश्योरेन्स कंपनीने सेटवर जाऊन पुर्ण नुकसाचाना रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्टनुसार उघड्या ठिकाणी शूटिंग सुरु असल्यामुळे आग लवकरच पसरली. इंश्योरेन्स कंपनीने नुकसानाचा रिपोर्ट तयार केला आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउसला याचे क्लेम देण्यात येणार आहे.

 

विमा कंपनीचा मान्य करण्यास दिला होता नकार
सूत्रांनुसार सेटवरील सर्व साहित्याचा विमा काढण्यात आला होता. परंतू कंपनीला नुकसान दाखवण्यात आले तेव्हा त्यांनी क्रू मेंबर्सनी केलेल्या दुर्लक्षामुळे असे झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सेटवर पुरेपूर सुरक्षा नव्हती. आगीपासून बचाव करण्यासाठी सेटवर फक्त वॉटर टँकर होते. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देणार नाही. परंतू आता विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास होकार दिला आहे. 

- अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना हा चित्रपट प्रोड्यूस करत आहे.
- चित्रपटाच्या शूटिंगसाठी टीम 20 मेला हिमाचलच्या सुंदर वातावरणात शूटिंगची तयारी करत आहे. चित्रपटाचे सर्व प्रमुख कलाकार 20 मेपासून लाहोर-स्पीतिमध्ये शूटिंग करतील. येथे 12 दिवस चित्रपटाची शूटिंग सुरु असणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाच्या सेटचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...