आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूसमयी फक्त 47 वर्षांचा होता हा अभिनेता, अंत्ययात्रेकडे सेलिब्रिटींनी फिरवली होती पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबईः 'त्रिदेव' (1989), 'चमत्कार' (1992), 'मोहरा' (1994) आणि 'खिलाडियों का खिलाडी' (1996) या चित्रपटांमध्ये झळकलेले  अभिनेते गॅविन पॅकर्ड बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर गेले आणि चित्रपटसृष्टीलाच त्यांचा विसर पडला. इतकेच नाही तर त्यांच्या अंत्ययात्रेकडेही सेलिब्रिटींनी पाठ फिरवली होती. मृत्यूसमयी ते 47 वर्षांचे होते. 


आयरिश वंशाचे होते गॅविन पॅकर्ड...
- पॅकर्ड यांचा जन्म 8 जून 1964 रोजी कल्याण येथे झाला होता. पाच बहीणभावंडांमध्ये ते थोरले होते.

- त्यांचे वडील अर्ल कॉम्प्युटर एक्सपर्ट तर आई बारबरा या गृहिणी होत्या. त्या कोकणी महाराष्ट्रीय होत्या.

- पॅकर्ड यांचे आजोबा हे आयरिश-अमेरिकन होते. ते यूएस आर्मीचे सदस्य म्हणून बंगळूरु येथे आले आणि नंतर भारतातच स्थायिक झाले होते.

 

संजय दत्त-सुनील शेट्टीला दिले होते बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षण... 
- एकेकाळी आपल्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गॅविन यांनी विविध शरीरसौष्ठव/ बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवला होता.
- अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी यांनाही बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षण देण्यात गॅविन यांचा मोलाचा वाटा होता. इतकेच नव्हे तर सलमान खानचा अंगरक्षक शेरा यालाही गॅविन यांनीच प्रशिक्षण दिल्याचे म्हटले जाते.  


पुढे वाचा, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर धाकट्या भावासोबत राहायचे गॅविन...  

बातम्या आणखी आहेत...