आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पॅडमॅन\' ने पार केला 50 कोटींचा आकडा, तर \'पद्मावत\'ने गाठले 260.75 कोटींचे शिखर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' आणि संजय लीला भन्साळींचा 'पद्मावत' बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाने घेत आहे. अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' ने अवघ्या 5 दिवसातच 50 कोटींचा आकडा ओलांडलाय. मंगळवारपर्यंत पॅडमॅनने 52.04 कोटींचा गल्ला जमावलाय. पॅडमॅनने पहिल्याच दिवशी 10.26 कोटींची कमाई केली होती. दूस-या दिवशी 13. 68 कोटी, तिस-या दिवशी म्हणजे रविवारी 16.11 कोटी, मंगळवारी 5.87 कोटी तर मंगळवारी 6.12 कोटींची कमाई केली. फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे.

 

'पद्मावत'ने गाठले 260.75 कोटींचे शिखर
तर पद्मावतने अवघ्या तीन आठवड्यात 260.75 कोटींचे शिखर पार केलेय. 'पद्मावत' ने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा आकडा पार केला होता. यावरुन अंदाज लावला जात होता की, हा चित्रपट मोठी कमाई करणार. या चित्रपटात रणवीर कपूर, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पद्मावत आणि पॅडमॅनचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...