आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने दिले सलमान-शाहरुख आणि बिग बीला #पॅडमॅन चॅलेंज, पॅड घेऊन दिसले हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आप्टे स्टारर चित्रपट 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. चित्रपटात सॅनिटरी नॅपकिनविषयी जणजागृती करण्याचे काम केलेय. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नवीन पध्दत काढली आहे. त्यांनी नुकताच 'पॅडमॅन चॅलेंज' नावाची सुरुवात केली आहे. अशा वेळी जो स्टार दूस-या एखाद्याचे नाव नॉमिनेट करेल त्यांना आपल्या हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करावा लागेल. आमिरने दिला सलमान-शाहरुख आणि अमिताभला चॅलेंज...


- पॅडमॅन चॅलेंजमध्ये आपल्या तीन मित्रांना नॉमिनेट करायचे आहे.
- आमिर खानने शुक्रवारी 'पॅडमॅन चॅलेंज' अॅक्सेप्ट केले आणि सोशल मीडियावर सॅनेटरी पॅड हाता घेऊन एक फोटो पोस्ट केला होता.
- त्याने ट्वीट करुन लिहिले की, "धन्यवाद ट्विंकल खन्ना, माझ्या हाता पॅड आहे आणि यात लाजायची काहीच गरज नाही, ही नैसर्गिक कंडीशन आहे. #पॅडमॅन चॅलेंज"
- आमिरने या फोटोसोबत शाहरुख खान, सलमान खान आणि अमिताभ बच्चनला या चॅलेजसाठी नॉमिनेट केले आहे.

या स्टार्सनेही शेअर केले पॅडसोबत फोटो
- चित्रपटात लीड स्टार अक्षय कुमारने हाता पॅड घेऊन एक फोटो पोस्ट केला.
- त्याने आलिया भट, दीपिका पदुकोण आणि विराट कोहलीला हे चॅलेंज दिले आहे.
- सध्या आलिया भटने हे चॅलेंज स्विकारले आहे आणि आपल्या हाता सॅनिटरी नॅपकिन घेऊन फोटो शेअर केलाय.
- चित्रपट अभिनेत्री राधिका आप्टेनेसुध्दा पॅडसोबत आपला फोटो पोस्ट केला. तिने आयुष्मान खुराना, कल्कि कोचलिन आणि अदिति राव हैदरीला या चॅलेंजसाठी नॉमिनेट केले आहे.
- यासोबतच सोनम कपूरनेही सॅनिटरी नॅपकिनसोबत आपला फोटो पोस्ट केला आणि भाऊ अर्जुन कपूर, स्वरा भास्कर आणि जॅकलीन फर्नांडीसला नॉमिनेट केले आहे.
- शबाना आजमी यांनीही हे चॅलेंज एक्सेप्ट करुन हाता पॅड घेऊन फोटो पोस्ट केला आहे.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, हे सेलेब्स दिसले हाता सॅनिटरी नॅपकिन घेऊन...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...