आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On location Pic: रिलीज झाला 'पॅडमॅन', पाहा अक्षय, सोनम, राधिकाचा सेटवरील अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट 'पॅडमॅन' शुक्रवारी 9 फेब्रुवारीला बॉक्सऑफिसवर दाखल झालाय. चित्रपटाची कथा पाहता हा चित्रपट बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असे चित्र आहे. भारतात तब्बल 2750 स्क्रिनवर तर ओव्हरसीजनमध्ये 600 स्क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी सेटवर कलाकारांचा अंदाज कसा असायचा हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

 

अशी आहे कथा
पॅडमॅन हा चित्रपट पद्म अवॉर्डी अरुणाचलम मुरुगनाथमच्या बायोपिकवर बेस्ड आहे. यात अक्षय कुमार सोशल वर्करची भूमिका करत आहे. चित्रपटात अक्षय कुमार महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्यांवर समाजात जनजागृती पसरवण्याचे काम करत आहे. यात महिलांसाठी असणाऱ्या सॅनिटरी पॅडचे मशीन बनवण्याचा आणि ते त्या महिलांपर्यंत पोहचवण्याच्या संघर्षापर्यंतचा त्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात अक्षयच्या पत्नीची भूमिका राधिका आपटेने साकारली आहे.  तर सोनम कपूरही  चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. ट्विंकल खन्नाची निर्मिती असलेला आणि दिग्दर्शक आर. बाल्की यांचा हा चित्रपट आज बॉक्सऑफिसवर दाखल झालाय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पॅडमॅनचे ऑनलोकेशन फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...