आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या 'पॅडमॅन' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत अक्षयने याची घोषणा केली. यावेळी संजय लीला भन्साळीदेखील अक्षयसोबत उपस्थित होते. 'पॅडमॅन' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज होणार होता, पण आता 9 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय लीला भन्साळींनी अक्षयला त्याच्या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याची विनंती केली होती. अक्षयने त्यांच्या विनंतीला मान देत हा निर्णय घेतला. याबद्दल संजय लीला भन्साळींनी अक्षयचे आभार व्यक्त केले आहेत.
'पद्मावत'मुळे पुढे ढकलले प्रदर्शन...
संजय लीला भन्साळींचा 'पद्मावत' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामुळे पॅडमॅनचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. 'पद्मावत' या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर पॅडमॅनमध्ये अक्षय कुमारसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर मेन लीडमध्ये आहेत. दोन्ही बिग बजेट आणि बिग बॅनरचे चित्रपट आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.