आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसात \'पद्मावत\' ने कमावले 100 कोटी, विदेशातही कमाई करतोय चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात तीव्र विरोधानंतर रिलीज झालेल्या 'पद्मावत' ने संजय लीला भंसालीच्या 'बाजीराव मस्तानी' च्या जवळपास दुप्पट कमाई केलीय. देशभरात चित्रपट प्रदर्शित न होऊनही पहिल्या 4 दिवसात 100 कोटींची कमाई केलीय. 2015 मध्ये आलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटाने चार दिवसात 57 कोटींची कमाई केली होती. दोन्हीही चित्रपटात स्टारकास्ट एकच आहे. जर पीरियड चित्रपटांमध्ये या चित्रपटाची बरोबरी केली तर 'बाहुबली-2' ची चार दिवसांची कमाई 'पद्मावत' पेक्षा 78 कोटींनी जास्त होती.


150 कोटींपर्यंत पोहोचतेय फिल्म
- फिल्म ड्रेड अॅनालिस्ट आमोद मेहरा सांगतात की, येवढ्या विरोधानंतरही पद्मावत रविवारपर्यंत 150 कोटींचा व्यवसाय करु शकते. कारण विकेंडचा जास्त फायदा मिळेल. फिल्मसाठी खुप मोठ्या प्रमाणात अडवान्स बुकिंग केलीय.
- तर दूसरीकडे फिल्म ड्रेड अॅनालिस्ट गिरीश जौहरला बिझनेसपेक्षा जास्त लोकांच्या सिक्युरिटीची काळजी आहे. 'चित्रपटाच्या कमाईविषयी अंदाज लावला जात होता की, फिल्म पहिल्या दिवशी 20 कोटी कमावेल. परंतू फक्त 5 कोटी रुपये मिळाले आणि दूस-या दिवशी 19 कोटी तर तिस-या दिवशी 32 कोटी कमाई झाली. आता फिल्म जवळपास 100 कोटींपर्यंत पोहोचलीय.
राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात फिल्म रिलीज झाली नाही.

 

128 कोटीं रुपये होऊ शकते फिल्मचे कलेक्शन
- अमोदनुसार,  "अंदाज आहे की, फिल्म राजस्थानमध्ये 4 कोटी, गुजरातमध्ये 12 कोटी, उत्तरप्रदेशात 10 कोटी, मध्यप्रदेशात 2 कोटी कमावू शकली असती. फिल्मचे 4 दिवसांचे कलेक्शन 28 कोटी होऊ शकले असते. म्हणजेच जवळपास 128 कोटी रुपयांचा व्यवसाय या फिल्मने केला असता."
-  बाहुबली-2 च्या हिन्दी वर्जनने सुरुवातीच्या 4 दिवसात 178 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. अशा प्रकारे बाहुबलीपेक्षा पद्मावत 50 कोटींनी मागे आहे. बाहुबली-2 ने सर्व भाषांमध्ये 383 कोटींचा व्यवसाय केला होता.

 

विदेशामध्ये केली इतकी कमाई

ऑस्ट्रेलिया

गुरुवारी - 363,973 अमेरिकन डॉलर

शुक्रवारी - 363,973 अमेरिकन डॉलर

शनिवारी- 462,288 अमेरिकन डॉलर

एकुण कमाई - 1,363,791 अमेरिकन डॉलर म्हणजेच 7.04 कोटी रुपये.

 

आयर्लंड

आयर्लंडमध्ये गुरुवार, शुक्रवार आणि शिवारमध्ये जवळपास 4.82 कोटींची कमाई झाली आहे. 

 

अमेरिका, ब्रिटेन, पाकिस्तानमध्ये अनकट दाखवली जात आहे पद्मावत, वाचा पुढची स्लाइडवर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...