आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box Office Collection:\'पद्मावत\'ने पहिल्या दिवशी कमावले एवढे कोटी, विरोधामुळे बसला 12 Cr चा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: चित्रपटाची घोषणा झाल्यापासून वादात सापडलेला ‘पद्मावत’ सिनेमा 25 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. त्यापूर्वी 24 जानेवारी रोजी काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. 24 तारखेला या चित्रपटाचे पेड प्रीव्ह्यू झाले होते. पेड प्रीव्ह्यूमधून या चित्रपटाने पाच कोटींची कमाई केल्याची माहिती व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली. तर 25 जानेवारी रोजी 7 हजार स्क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज झाला.

 

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि गोवा या देशातील चार राज्यांत हा चित्रपट रिलीज झाला नाही. मात्र तरीदेखील रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 18 कोटींचा व्यवसाय केला. ट्रेड अॅनालिस्ट सुमित कडेल यांनी ट्वीटरवर ट्वीट केले, की 4 राज्यांत चित्रपटाच्या रिलीजला विरोध झाल्यानंतरदेखील चित्रपटाने पहिल्या दिवशी 18 कोटींचे कलेक्शन केले. 

 

..तर पहिल्या दिवशी चित्रपटाने कमावले असते 30 कोटी 
-कडेल यांच्यामते, जर चित्रपट शांततेच्या वातावरणात सर्वत्र रिलीज झाला असता, तर ओपनिंग डेला सुमारे 30 कोटींच्या घरात चित्रपट व्यवसाय करु शकला असता. 
- 4 राज्यांत राजपूत करणी सेनेच्या विरोधामुळे चित्रपटाचे पहिल्या दिवशी 10 ते 12 कोटींचे नुकसान झाले. 
- या चित्रपटाचे बजेट 180 कोटी इतके आहे. आयमॅक्स आणि थ्रीडीमध्ये हा चित्रपट कन्व्हर्ट करण्यासाठी 20 कोटींचा खर्च करण्यात आला. 


वाढू शकतो कमाईचा आकडा...  
- चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून करणी सेना आक्रमक झाली. अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर जाळपोळ करण्यात आली, गुरगावमध्ये स्कूल बसवर देखील काही कंटकांनी चित्रपटाला विरोध करत दगडफेक केली. देशभरातून तीव्र विरोध होत असतानाही प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.   
- पुढील 15 दिवस एकही मोठा चित्रपट रिलीज होणार नाही, त्यामुळे याचा फायदा पद्मावतला मिळू शकतो.
- लागोपाठ आलेली सुटी आणि हा चित्रपट पाहण्याचं कुतूहल यामुळे पुढच्या तीन दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो असं चित्रपट व्यापार विश्लेषकांचं मत आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये स्थान पटकावू शकतो.


 पुढील स्लाईड्सवर बघा, 'पद्मावत' चित्रपटातील काही निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...