आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचार-बंदी असूनही ‘पद्मावत’ची कमाई ‘बाजीराव मस्तानी’ पेक्षा दुप्पट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हिंसक विरोध-निदर्शने सुरू असतानाच प्रदर्शित झालेल्या पद्मावत चित्रपटाने कमाईच्या बाबतीत संजय लीला भन्साळीच्याच बाजीराव मस्तानीपेक्षा दुप्पट कमाई केली आहे. देशभरात प्रदर्शित न होऊनही चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत १०० कोटी रुपये कमावले आहेत. २०१५ मध्ये आलेल्या बाजीराव मस्तानीने चार दिवसांत फक्त ५७ कोटी रुपयेच कमावले होते. बाहुबली-२ ची चार दिवसांची कमाई  ७८ कोटी रुपये होती.


ट्रेड-विश्लेषक अमूल मोहन म्हणाले की, या चार राज्यांत चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्याने त्याला ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. चित्रपटाने शुक्रवारपर्यंत ३२ कोटी रुपये कमावले होते. म्हणजे त्याचे दररोज १० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. एकट्या गुजरात राज्यातच १२ ते १५ टक्के नुकसान होत आहे. भन्साळींचे चित्रपट तिथे चांगलेच लोकप्रिय ठरतात. दुसरीकडे बाहुबली-२ च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या आठवड्यात सुमारे १७८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. अशाप्रकारे पद्मावत बाहुबलीपेक्षा ५० कोटी रुपयांनी मागे आहे. बाहुबली-२ ने पूर्ण देशात चार दिवसांत सर्व भाषांत सुमारे ३८३ कोटी रुपये कमावले होते. कुठल्याही वादाशिवाय हा चित्रपट संपूर्ण देशात एकाच वेळी प्रदर्शित झाला होता. चित्रपट ट्रेड विश्लेषक अमोद मेहरा म्हणाले की, एवढ्या  विरोधानंतरही चित्रपट रविवारी रात्रीपर्यंत १५० कोटींचा व्यवसाय करू शकतो. कारण लाँग विक-एंडचा फायदा त्याला मिळेल. कोमल नाहटा यांच्या म्हणण्यानुसार एक-दोन दिवसांत परिस्थिती सुधारेल. लोक विरोधाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतील आणि विरोध असलेल्या ठिकाणीही हा चित्रपट प्रदर्शित होईल. दुसरीकडे चित्रपट ट्रेड विश्लेषक गिरीश जोहक यांना व्यवसायापेक्षा जास्त चिंता लोकांच्या सुरक्षेची आहे. ते म्हणाले की, हा चित्रपट पहिल्याच दिवशी २० कोटी कमावेल, असा अंदाज होता, पण पहिल्या दिवशी फक्त ५ कोटी रुपये मिळाले. आमची चिंता प्रेक्षकांची सुरक्षा आणि सरकारची मूकदर्शक भूमिका याबद्दल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही.

 

इतका फरक अाहे ‘पद्मावत’ व ‘बाहुबली-२’ मध्ये

 

बाहुबली-2: पहिल्या चार दिवसांतील चित्रपटाचा हिंदी भाषेतील गल्ला १७८ काेटी रुपये

- चित्रपट देशभरात ६,५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला तेव्हा ही कमाई झाली.
- विदेशात एक हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित.
- नेटफ्लिक्सने चित्रपटाचे डिजिटल अधिकार २५.५ काेटी रुपयांत घेतले हाेते.

 

पद्मावत: चित्रपटाची पहिल्या चार दिवसांची हिंदी भाषेतील कमाई १०० काेटी रुपये

- केवळ ३,५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित. चार राज्यांमध्ये प्रदर्शित झाला नाही.
- विदेशात ८०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.
- अॅमेझाॅन प्राइमने चित्रपटाचे डिजिटल अधिकार २५ काेटींत घेतले अाहेत.

 

जर ‘पद्मावत’ हा ‘बाहुबली’सारखा चार राज्यांतही प्रदर्शित झाला असता, तर २८ काेटींची अतिरिक्त कमाई झाली असती.

 

 

 


..तर पहिल्या दिवशी चित्रपटाने कमावले असते 30 कोटी
- ट्रेड अॅनालिस्ट सुमित कडेल यांच्यामते, जर चित्रपट शांततेच्या वातावरणात सर्वत्र रिलीज झाला असता, तर ओपनिंग डेला सुमारे 30 कोटींच्या घरात चित्रपट व्यवसाय करु शकला असता. 
- 4 राज्यांत राजपूत करणी सेनेच्या विरोधामुळे चित्रपटाचे पहिल्या दिवशी 10 ते 12 कोटींचे नुकसान झाले. 
- या चित्रपटाचे बजेट 180 कोटी इतके आहे. आयमॅक्स आणि थ्रीडीमध्ये हा चित्रपट कन्व्हर्ट करण्यासाठी 20 कोटींचा खर्च करण्यात आला.

 

चार राज्यांत प्रदर्शित झाला नाही चित्रपट... 

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि गोवा या देशातील चार राज्यांत हा चित्रपट रिलीज झाला नाही. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, चित्रपटातील रणवीर-दीपिका आणि शाहीद यांच्या लूकचे खास फोटोज....

 

बातम्या आणखी आहेत...