आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पाकीजा\' च्या अभिनेत्रीचे निधन, हॉस्पिटलमध्ये सोडून फरार झाला होता मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गतकाळातील अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईच्या एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी 9 वाजता शेवटचा श्वास घेतला. प्रोड्यूसर अशोक पंडित यांनी हे वृत्त कन्फर्म केले आहे. 21 एप्रिल 2017 रोजी लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यामुळे गीता कपूर यांचा मुलगा राजा त्यांना     सोडून फरार झाला होता. मुंबई, गोरेगाव येथील SRV या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना मुलाने सोडले होते. ज्यावेळी गीता कपूर यांना कळाले की, त्यांचा मुलगा त्यांना सोडून फरार झाला. तेव्हा त्या ठसाठसा रडल्या होत्या. हा व्हिडिओ त्याच काळात समोर आला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मुलाशी संपर्क साधला परंतू तो घ्यायला आला नव्हता. गीता यांच्या घरीही लॉक लावलेले होते. शेजारी राहणा-या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, 3 महिन्यापुर्वी हे किरायाने राहायला आले होते आणि आता येथे राहत नाही. हे सर्व पाहून असे वाटते की, मुलाने आईला पुर्ण प्लानिंगने सोडले आणि निघून गेला. यानंतर प्रोड्यूसर रमेश तौरानी आणि अॅक्टर अशोक पंडित यांना माहिती मिळताच, त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अभिनेत्रीची विचारपुस केली. त्यांना हॉस्पिटलचे 1.5 लाख रुपये भरले. यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गीता यांना वृध्दाश्रमात पाठवण्यात आले होते.  

 

 

बातम्या आणखी आहेत...