आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकवर तयार होणा-या चित्रपटातील परेश रावलचा फर्स्ट Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सर्जिकल स्ट्राइकवर तयार होणारा 'उडी' चित्रपटातील परेश रावलचा नवीन लूक समोर आला आहे. यामध्ये ते NSA (नॅशनल सिक्युरिटी अॅडवायजर) अजीत डोभालच्या भूमिकेत दिसणार आहे. परेश रावलने स्वतः ट्वीटरवर आपला फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात विक्की कौशल आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


कोण आहेत डोभाल...
20 जानेवारी, 1945 मध्ये उत्तरखंडच्या पौडी गढवालमध्ये जन्मलेल्या अजीत डोभालने अजमेर मिलिट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. डोवाल पाकिस्तानच्या लाहौरमध्ये गुप्तहेर बनून 7 वर्षे मुस्लिम बनून राहिले. 1968 च्या बॅचचे केरळ येथील IPS ऑफिसर डोभालने आपल्या नियुक्तीच्या चारवर्षांनंतर 1972 मध्ये इंटेलीजेंसी ब्यूरो (IB) मध्ये गेले. संपुर्ण करिअरमध्ये डोभाल यांनी फक्त 7 वर्षे पोलिसाचा यूनिफॉर्म घातला. त्यांनी जास्तीत जास्त काळ गुप्तहेर म्हणून काम केले. 


2014 मध्ये राष्ट्रीय संरक्षण सल्लागार
2005 मध्ये ते IB डायरेक्टरच्या पोस्टवरुन रियाटर झाले. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते डोभाल मल्टी एजेंसी सेंटर आणि जॉइंट इंटेलिजेंस टास्क फोर्सचे चीफ होते. ते विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट राहिले आहेत. विवेकानंतर फाउंडेशनला राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (RSS) च्या थिंक टँकच्या रुपायत ओळखले जाते. 37 वर्षे गुप्तहेर राहिल्यानंतर 31 मे, 2014 रोजी ते देशाच्या राष्ट्रीय सुरक्षाचे सल्लागार बनले. 

 

ऑपरेशन ब्लूस्टार
जून 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर आतंकवादी हल्ला झाला होता. यावेळी काउंटर ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलला. ते रिक्षावाला बनून मंदिरात गेले आणि आतंकवाद्यांची माहिती सेनेला दिली. यांच्या आधारावर ऑपरेशनमध्ये भारतीय सेनेला यश मिळाले. 1988 मध्ये सैन्य सन्मान चक्राने त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान स्विकारणारे ते पहिले तरुण ऑफिसर बनले. हा पुरस्कार फक्त आर्मीच्या लोकांनाच दिला जातो.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...