आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजू'मध्ये सुनील दत्त बनलेल्या परेश रावलने 32 दिवसात कमी केले होते 12 किलो वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'संजू' 29 जूनला रिलीज होत आहे. या चित्रपटात परेश रावल सुनील दत्तच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ही भूमिका मला करायला मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. परेश रावलनुसार, चित्रपटासाठी त्यांनी 12 किलो वजन कमी केले. ते सांगतात की, "पहिल्या दिवशी मी नर्वस होतो. मला 32 दिवसात 12 किलो वजन कमी करायचे होते. पहिल्या दिवशी सेटवर थोडे अस्वस्थ वाटले. परंतू जेव्हा मी माझा पहिला शॉट दिला तेव्हा हिरानी म्हणाले  'आपल्याला आपले सुनील दत्त मिळाले.'" 


राजकुमार हिरानीसोबत काम करण्याचे स्वप्न पुर्ण
परेश यांनी सांगितलेकी, "राजकुमार हिरानी यांनी मला कॉल केला तेव्हा मी खुश होतो. मला त्यांच्यासोबत 'मुन्नाभाई'मध्ये काम करायचे होते, परंतू ते शक्य झाले नाही. तेव्हापासून मला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. ते संजय दत्तवर चित्रपट बनवत असल्याचे मी ऐकले, नंतर त्यांनी मला सुनील दत्तची भूमिका ऑफर केली. मला खुप आनंद झाला. परंतू थोडी भीतीही वाटली. मला वाटले की, बायोपिक आणि रियल लाइफ कॅरेक्टर प्ले करणे खुप अवघड होईल. परंतू मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खुप उत्साहित होतो."


- परेश यांनी सांगितले की, "मी सुनील दत्त यांना पर्सनली ओळखत नव्हतो. त्यांना दोन किंवा तीन वेळा भेटलो. ते सोशल वर्कमध्ये खुप सक्रिय होते आणि कँसर पेशेंट्सची मदत करायचे. ते सर्वांच्या चांगल्याचा विचार करत होते आणि त्यांना भेटलो की, पॉजिटिव्हिटी मिळत होती. संजयची स्टाइल वेगळी आहे तर त्याला पडद्यावर साकारता येऊ शकते. परंतू सुनील साहेब असे नव्हते. ते खुप नॉर्ल व्यक्ती होते. त्यांची वेगळी स्टाइल नव्हती, जी कॉपी करता येईल."

 

'सुनील दत्तसोबत माझे दिव्य कनेक्शन'
परेश रावल यांनी सांगितले की, "मला असे वाटते की, काही तरी दिव्य कनेक्शन आहे, ज्यामुळे मी सुनील दत्त यांची भूमिका साकारत आहे. मी एक किस्सा तुम्हाला सांगेल. 25 मे, 2005 च्या काळातील हा किस्सा आहे. मी शूटिंग सेटवर होतो. मला घरी येण्यासाठी उशीर होईल असे मी बायकोला सांगत होतो. याच काळात शूटिंगवर असताना सुनील दत्त यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. मी पुन्हा बायकोला फोन करुन सांगितले की, मी दत्त साहेबांच्या घरी जाऊन येईल. तेव्हा तिने मला सांगितले की, सुनील दत्त यांनी तुमच्यासाठी लेटर पाठवले आहे. मी तिला विचारले लेटरमध्ये काय आहे, तर तिने सांगितले की, त्यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे. पण मी हैराण होतो. कारण माझा वाढदिवस 30 मे रोजी होती त्यांनी मला यापुर्वीच शुभेच्छा दिल्या होत्या. यापुर्वी दत्त साहेब आणि माझ्यामध्ये होळी आणि दिवाळीच्या कधीच शुभेच्छा गेलेल्या नव्हता. मग या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे लेटर कसे?"


"या गोष्टी मला आता कळतात. 3 जोनेवारी, 2017 ला मी राजकुमार हिरानी यांना भेटायला जात होतो. मी माझ्या बायकोला म्हणालो की, मी परत येऊन माझे काही डॉक्यूमेंट्स घेऊन जाईल. मी जेव्हा राजूसोबत मीटिंगमध्ये होतो, तेव्हाच मला बायकोचा फोन आला की, डॉक्यूमेंट्ससोबत दत्त साहेबांनी तुम्हाला दिलेले लेटरही सापडले आहे. नंतर मी हे लेटर राजूलाही दाखवले."


'संजय दत्तला 100 सॅल्यूट':
परेश रावलने यावेळी संजयची स्तुती केली. ते म्हणाले की, "मी त्यांना 100 सेल्यूट देतो. कारण त्यांनी त्यांच्या संपुर्ण आयुष्य स्क्रीनवर उघडे केले. त्यांना आजच्या तरुणाईला सांगायचे आहे की, मी खुप काही भोगले आहे, तुम्ही असे करु नका. संजयने आपल्या आयुष्यात ड्रग्सपासून सुटका मिळवली. हे सोपे नव्हते. परंतू तरीही नंतर ते ड्रग्सकडे वळले नाही."

एक्स्ट्रा शॉट: परेश रावल यांनी 1979 मध्ये मिस इंडियाचा ताज मिळवलेली अभिनेत्री स्वरुप संपतसोबत 1987 मध्ये लग्न केले होते.
 

बातम्या आणखी आहेत...