आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मुंबईतील घराबाहेर जमली गर्दी, उशीरा रात्री पोहोचणार पार्थिव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 वर्षी दुबईत श्रीदेवीने अखेरचा श्वास घेतला. येथे भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी कुटुंबासोबत पोहोचली होती. रविवारी पहाटे श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त येताच बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिच्या मुंबईतील 'Green Acres' या घराबाहेर मीडियाची गर्दी जमली आहे.

 

सोमवारी होऊ शकतात अंत्य संस्कार...  

- अलीकडेच श्रीदेवीच्या पार्थिवाचे एक छायाचित्र समोर आले. दुबईत पोस्टमार्टमसाठी पार्थिव घेऊन जातानाचे हे छायाचित्र आहे. 
- आज उशीरा रात्री म्हणजे 11 च्या सुमारास अनिल अंबानी यांच्या खासगी विमानाने श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. 

- सोमवारी मुंबईत श्रीदेवीवर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे. 
- आगामी 'धडक' या चित्रपटाच्या शूटिंग शेड्युलमुळे श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर दुबईत लग्नात सहभागी होऊ शकली नव्हती. त्यामुळे आई आणि मुलीची शेवटची भेट होऊ शकली नव्हती. आईच्या निधनाचे वृत्त समजात जान्हवी तिचे पार्थिव आणण्यासाठी दुबईला रवाना झाली. 

 

श्रीदेवीने या चित्रपटांत केला अभिनय
- 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडू येथे जन्मलेल्या श्रीदेवीने 1975 मध्ये आलेल्या 'जूली' चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. या चित्रपटात ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.
- 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' या चित्रपटातून ती रात्रीतून स्टार झाली होती. त्यानंतर श्रीदेवीने कधीही मागे वळून पाहिले नव्हते.
- श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (1978), 'हिम्मतवाला' (1983), 'मवाली' (1983), 'तोहफा' (1984), 'नगीना' (1986), 'घर संसार' (1986), 'आखिरी रास्ता' (1986), 'कर्मा' (1986), 'मि. इंडिया' (1987) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांत अभिनय केला.
- श्रीदेवी शेवटची 'मॉम' या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट गेल्यावर्षी 7 जुलै रोजी रिलीज झाला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवीच्या घराबाहेरचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...