आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: भावासोबत कॅलिफोर्नियामध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हेमा मालिनीची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल सध्या कॅलिफोर्नियामध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. ईशाने व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे आपले फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती भाऊ अभय देओलसोबत दिसतेय. फोटोमध्ये दोघं एक पोज देताना दिसत आहेत. या फोटोवर ईशाने Soul connect 💞@abhaydeol#californiacation. असे कॅप्शन दिले आहे. ईशासोबत येथे आई हेमा मालिनी आणि नवरा भरत तख्तानी आहेत. ईशा-भरतच्या मुलीचे नाव राध्या आहे. ईशा शेवटच्यावेळी 'किल देम यंग'(2015) या चित्रपटात दिसली होती. ईशा लवकरच केटवॉक या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर ईशाने आपल्या इंस्टाग्रामवर काही दिवसांपुर्वीच शेअर केले होते. 


धमेंद्रच्या लहान भावाचा मुलगा आहे अभय
- अभय देओल हा धर्मेंद्र यांचा लहान भाऊ अजीत देओलचा मुलगा आहे. अभयने 2005 मध्ये 'सोचा न था' मधून डेब्यू केला होता. या चित्रपटात आयशा टाकिया त्याची अभिनेत्री होती.
- अभय शेवटच्या वेळी 'नानू की जानू'(2018) मध्ये दिसला होता. 'झीरो',  'हैप्पी फिर भाग जाएगी', 'द फील्ड' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. हे सर्व चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहेत.
- ईशाने नव-यासोबत फोटो शेअर करत  'Brunching with my man 💕 @bharattakhtani3 ... while Nani @dreamgirlhemamalini baby sits our darling #radhyatakhtani 🤗 gratitude!'. असे कॅप्शन दिले आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...