आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Audienceच्या मनात 'धडक' मारत नाही हिंदीतील 'सैराट', हे आहे फिल्मचे प्लस आणि मायनस पॉईंट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर ही नवी जोडी रूपेरी पडद्यावर आणलेला धडक, प्रेक्षकांच्या मनात धडक मारु शकत नाही. दोघा नव्या कलावंतांची एन्ट्री आश्वासक आहे. प्रचंड काल्पनिक असलेल्या हिंदी चित्रपटांच्या प्रेमकहाण्यांत ही कथा वास्तववादीपणामुळे निराळी वाटते. मात्र, प्रेक्षकांच्या मनाला भिडत नाही. जाणून घेऊयात या चित्रपटातील प्लस आणि मायनस पॉईंट्स... 


- एक दूजे के लिये, कयामत से कयामत तक, किंवा अलिकडेच येऊन गेलेला इश्कजादे असाे अथवा कमाई अन लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडणारा सैराट. या सर्वच चित्रपटात  प्रेमीयुगल मृत्यूमुखी पडले अन् चित्रपट यशस्वी ठरले आहेत. सैराटच्या प्रचंड यशामुळे शशांक खैतानने इशान आणि जान्हवी या ताज्या जोडीला लॉन्च करण्यासाठी सैराटचा रिमेक करण्याचा घाट घातला.  रिमेक असल्याने कथेत वेगळेपण नव्हते. प्रत्येक वेळी काय घडणारा ही रंजकता, उत्सुकता यात नव्हती. मात्र, चित्रपटाचा शेवट सैराटप्रमाणेच काळजाचा ठोका चुकवणारा आहे, यात शंका नाही. 

 

- जान्हवीने सुंदर अभिनय केला आहे. आई श्रीदेवीप्रमाणे तिचा चित्रपट प्रवेश असल्याचे जाणवते. सदमा चित्रपटातून हिंदीत पर्दापण करताना श्रीदेवीचा दिसलेला निरागस चेहरा आणि धडकमधील जान्हवी यामध्ये साम्य जाणवते. मात्र, दमदार अभिनेत्री असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिला नक्कीच मेहनत करावी लागणार आहे. 

 

- इशानचा अभिनय चांगला आहे. सैराटच्या कोवळ्या प्रेमी युगलातील साधेपणा, सहजता यामध्ये जाणवत नाही. हिंदीत अशा प्रकारे वास्तववादी कथा दाखवणे फारसे रुचणारे नाही. कारण, हिंदीतील प्रेक्षकांना कल्पनाविश्वात जगण्याची सवय लागली आहे. सर्वसामान्य रस्त्यावर दिसणारी माणसे हिंदी चित्रपटात नसतात. चित्रपटातील पात्र आणि सामान्यांचे आयुष्य यामध्ये मोठी दरी आहे. ती दरी या चित्रपटात जाणवत नाही. 

 

- पटकथा सकस लिहीली गेली नसल्याने चित्रपट सैराटप्रमाणे प्रेक्षकांच्या हृदयावर गारुड करु शकत नाही. उदयपूर राजस्थानमधील हे जोडपे, कोलकत्यात येऊन राहते हा प्रवास सपाट वाटतो. त्यातील रंजकता यामध्ये दिसत नाही.

 

- नकल करतानाही आपली छाप सोडणे हे दिग्दर्शकाचे कौशल्य असते. मात्र, शशांक खैतान यामध्ये कमी पडला आहे. चित्रपटाची गाणी हिंदीतही खूप छान वाटतात. सहकलावंतांची पात्र दमदार लिहीली किंवा रचली गेली नाहीत. मंंजुळेंच्या सैराटमध्ये चित्रपटातील मुख्य कलावंतांखेरीज इतर पात्र दमदार होती. त्यामुळे चित्रपटानंतरही परशाचे मित्र, आर्चीचा भाऊ लक्षात राहतो.

 

- धडकमध्ये मात्र तसे होताना दिसत नाही. आशुतोष राणासारखा दमदार अभिनेत्याचा वापर करता आलेला नाही.  संघर्ष किंवा दुश्मनमध्ये आशुतोषच्या नुसत्या डोळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरते. पण, या चित्रपटात दिग्दर्शकाला ते कसब साधता आले नाही.  


पुढे वाचा, चित्रपटाविषयी आणखी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...