आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले केले नजरेच्या बाणांनी घायाळ, आता माराव्या लागताय कोर्टात चकरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई : मल्याळम चित्रपटातील गाणे व्हायरल झाल्यामुळे प्रिया प्रसिध्दी झोतात आली होती. या काळात तिच्यावर तक्रारही दाखल करण्यात आली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी ती आता सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील 'मानिक्या मलाराया पूवी' विषयी हैदराबादमध्ये रिपोर्ट दाखल करण्यात आलाय. प्रियाने सांगितले की, ज्या गाण्याविषयी तुम्हाला विरोध आहे ते गाणे 1978 मध्ये पीएमए जब्बार यांनी लिहिले आहे. आता 40 वर्षांनंतर भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्ट या याचिकेवरील सुनावनीसाठी तयार झाले आहे. याची सुनावनी बुधवारी होईल. 

 

का दाखल केला एफआयआर
- असे म्हटले जात आहे की, चित्रपटातील गाण्याचा वेगळा अर्थ काढून गाणे सादर केले. यामुळे तेलंगाना आणि महाराष्ट्रात तक्रार करण्यात आलीये.
- प्रियाने म्हणाली की, हे गाणे ट्रेडिशनल मुस्लिम साँग आहे. तरीही यावर वाद का केला जातोय, हे मला कळत नाहीये. हे गाणे पहिल्यांदा बार थलासेरी रफीकने गायले होते.
- तर चित्रपटाचे डायरेक्टर ओमर लुलु म्हणाले की, प्रेम हे सर्व सिमांच्या पलिकडचे आहे असा मॅसेज या गाण्यातून देण्यात आलाय. प्रियाचे एक्सप्रेशन आणि गाण्याविषयी खुप कॉन्ट्रोवर्सी केली जात आहे.


डोळे मारु एका रात्रीत प्रसिध्द झाली प्रिया प्रकाश
- 'ओरु अदार लव्ह' चित्रपटाच्या 'मानिक्य मलरया पूवी' गाण्यामध्ये प्रिया प्रकाशने डोळ्यांनी इशारे केले आहेत. हे गाणे शान रहमानने कम्पोज केलेय. तर विनीत श्रीनिवासनने याला आवाज दिलाय.
- फक्त 24 तासात या गाण्याला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि 50 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले होते.
- व्हेलेंटाइन वीकमध्ये जास्ती जास्त तरुणांनी तिची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. याच कारणांमुळे हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला.


इंस्टाग्रामवर 35 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स 
- प्रियाचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यावरुनच प्रियाच्या प्रसिध्दीचा अंदाज लावला जाऊ शकतो. तिचे इंस्टाग्रामवर अकाउंट भारतातील फास्टेस्ट ग्रोइंग इंस्टाग्राम अकाउंट्सपैकी एक आहे.

 

कोण आहे प्रिया प्रकाश वारियर...
- 'ओरु अदार लव्ह' प्रियाचा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटाच्या गाण्यातील एक्सप्रेशन आणि स्लाइलने प्रियाने कोट्यावधी लोकांची मन जिंकली आहेत.
- 18 वर्षांची प्रिया ही केरळची राहणारी आहे. प्रिया सध्या थ्रिसूरच्या विमला कॉलेजमधून बीकॉम शिकतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा, प्रिया प्रकाश वारियरचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...