आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Dances On Street Of Newyork For Hollywood Movie Isn't It Romantic

PHOTOS: न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर प्रियांकाने शूट केले हॉलिवूड चित्रपटाचे गाणे, पाहा तिच्या दिलखेचक अदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: प्रियांका चोप्राचे काही फोटोज समोर आले आहेत. तिचा नवीन बॉलिवूड प्रोजेक्ट भारत शूट करण्यापुर्वी ती एका हॉलिवूड चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली आहे. या चित्रपटाचे नाव  'Isn't It Romantic' असे आहे. यामध्ये प्रियांका हॉलिवूड स्टार लियाम हेम्सवर्थसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल न्यूयॉर्कमध्ये झाले. या दरम्यान एका गाण्याचे शूटिंग करण्यात आले. गाण्याच्या शूटिंगचे काही फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये प्रियांका पिंक ड्रेसमध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर डान्स करताना दिसतेय. या दरम्यानत तिचे एक्सप्रेशन जबरदस्त आहे आणि फोटो पाहून दिसतेय की, ती हे गाणे खुप एन्जॉय करतेय.


दोन वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटात नाही
गेल्या दोन वर्षांपासून प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने 'क्वांटिको' टीव्ही शोसोबतच  दोन हॉलिवूड चित्रपटात काम केले. यामध्ये 'बेवॉच' आणि 'अ किड लाइक जेक' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हॉलिवूडमध्ये व्यस्त असल्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर होती. 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' चित्रपटानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.


शोनाली बोसच्या पुढच्या चित्रपटात करणार काम
प्रियांकाने काही दिवसांपुर्वी एक फोटो शेअर केला होता. यामध्ये एक स्टोरी ड्राफ्ट दाखवण्यात आला. याचे नाव 'the sky is pink' असे होते. याच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने ‘And it begins #prep #hindimovie’ परंतू चित्रपटाचे टायगल 'The sky is pink' असे लिहिले होते. परंतू याविषयी अधिक माहिती मिळालेली नाही. हा चित्रपट ऑगस्ट 2018 मध्ये फ्लोरवर येईल. चित्रपटात प्रियांकासोबतच फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत असणार आहे. हे दोन्ही स्टार्स 'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे डायरेक्शन शोनाली बोस करणार आहेत.


'भारत' चित्रपट केला आहे साइन
या चित्रपटापुर्वी प्रियांका चोप्राने डायरेक्टर अली अब्बास जफर यांचा 'भारत' चित्रपट साइन केला आहे. चित्रपटात ती सलमान खानच्या अपोजिट दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग 17 जुलै पासून सुरु होईल. हा चित्रपट पुढच्यावर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होईल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांका चोप्राचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...