आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या शाही लग्नात का सहभागी झाली प्रियांका, काय आहे तिचे मेगनसोबतचे कनेक्शन?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लंडनः संपूर्ण जगाचे लक्ष शनिवारी होत असलेल्या ब्रिटनच्या शाही लग्नसोहळ्याकडे लागले आहे. प्रियांका एकमेव अशी भारतीय अभिनेत्री आहे, जिला प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मर्केल हिच्या लग्नाचे निमंत्रण मिळाले आहे. बॉलिवूडमधून फक्त तीच या लग्नसोहळ्यात सहभागी झाली आहे. यासाठी ती लंडनला पोहोचली आहे. 


अखेर प्रियांकालाच का मिळाले निमंत्रण.... 
- प्रियांका चोप्रा मेगन मर्केलची जवळची मैत्रीण आहे. याच कारणामुळे मेगनने प्रियांकाला लग्नाचे निमंत्रण दिले.
- प्रियांकाने सांगितल्यानुसार, मेगनसोबत तिची भेट तीन ते चार वर्षांपूर्वी एली मॅगझिनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात झाली होती. या कार्यक्रमात अनेक टीव्ही अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. त्याकाळात प्रियांका 'क्वांटिको' या टीव्ही सीरिजमध्ये काम करत होती.
- या कार्यक्रमात झालेल्या भेटीनंतर मेगनने तिच्या लाइफस्टाइल ब्लॉगसाठी प्रियांका चोप्राची मुलाखत घेतली होती. त्यानंतर दोघींमध्ये चांगली मैत्री झाली.
- टाइम मॅगझिनने मेगनची 100 सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये निवड केल्यानंतर प्रियांकाने तिच्यासाठी एक भावूक मेसेज देत एक लेख लिहिला होता.


पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियांका चोप्रासोबतचे अभिनेत्री मेगन मर्केलचे PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...