आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात वर्णभेदाला सामोरे गेली प्रियांका, फिसमध्येही केला जातो भेदभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सांगते की, तिला दोन्हीही ठिकाणी वर्णभेदाला सामोरे जावे लागले. एका इंटरनॅशनल पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने याविषयी सांगितले. तिने सांगितले की, स्किन कलरमुळे तिला एका हॉलिवूड चित्रपटाला मुकावे लागले होते. प्रियांकाने सांगितले की, "गेल्या वर्षी मी एका चित्रपटासाठी बाहेर होते. तेव्हाच एकाने माझ्या मॅनेजरला फोन करुन सांगितले की, मी त्यांच्या चित्रपटाच्या लायकीची नाही. फिजिकॅलिटी हे यामागचे कारण सांगण्यात आले."
 
प्रियांकाला मॅनेजरने समजावला फिजिकॅलिटीचा अर्थ...
- प्रियांकानुसार तिला पहिले फिजिकॅलिटीचा अर्थ माहिती नव्हता. यानंतर मॅनेजरने तिला सांगितले की, या शब्दाचा अर्थ शारीरिक संरचनेविषयी असतो. हे विशेषतः कलरसाठी वापरले जाते. मॅनेजरने तिला सांगितले की, त्यांना चित्रपटात अशी मुलगी हवी आहे जी सावळी नाही. प्रियांका म्हणते की, त्यावेळी हे एकून मी खुप हैरान झाले. मला खुप त्रास झाला होता. महत्त्वाचे म्हणजे काही वर्षांपुर्वी शिल्पा शेट्टीलाही वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते. ती ब्रिटिश रियालिटी शो 'बिग ब्रदर' मध्ये सहभागी होण्यास गेली होती तेव्हा हे घडले होते. परंतू तिने हा शो जिंकून सर्वांचे तोंड बंद केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अजून काय बोलली प्रियांका...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...